सध्या आपण सारेजण कोरोनासारख्या मोठ्या आजारासोबत लढत आहोत. पोलिस, डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवा  पुरवणारे कर्मचारी सारे जण आपल्यासाठी कोरोना  विरुद्ध दोन हात करत आहेत. आणि यामध्ये आपले मराठी कलाकारसुद्धा त्यांच्या परीने कोरोनाविरुद्ध जनजागृती करत आहे. नुकतंच सोनाली कुलकर्णी ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांना विरुद्ध एक भावनिक पोस्ट केली आहे. 


मराठी चित्रपटसृष्टीमधील अग्रगण्य अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच प्रेक्षकांसमोर काही तरी नवीन सादर करत असते. आणि आपण या समाजाचे काही देणं लागतो, याची जाणीव असताना सोनालीने कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासोबत होत असलेल्या भेदभाव विरुद्ध आवाज उठवला आहे. विचार बदल कोरोनाला हरवा, असं कॅप्शन देत, या व्हिडिओ  मध्ये सोनालीने कोविड पॉसिटीव्ह व्यक्ती आणि त्यांच्या परिवार सोबत कोणी भेदभाव करू नये अशी विनंती केली आहे. कोरोना सारखा भयंकर आजार आणि त्याच्या विळख्यामध्ये अडकलेले रुग्ण आणि त्याचे कुटुंब यासगळ्या सोबत उभं राहत आपण त्यांना मदत केली पाहिजे, आणि त्याच्या विरुद्ध होणाऱ्या भेदभावाला रोखण्यासाठी सोनाली कुलकर्णीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रत्येक जण आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सोनालीचा हा व्हिडिओ सुद्धा त्याचाच एक उदाहरण आहे. 


सध्याच्या बिकट परिस्थितीला आपण सारेजण घरामध्येच बसून दोन हात करु शकतो. कोरोनामुळे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सुद्धा तिच्या घरामध्येच बंद आहे. पण सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोरोना विरुद्ध जनजागृती करत, तिच्या चात्यांसोबत संवाद साधत आहे.