सध्या कोरोनासारख्या गंभीर आजाराने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. आणि या दरम्यान प्रत्येक जण त्यांच्या परीने जेवढी मदत शक्य होईल तेवढी करत आहे. आणि या साऱ्या मध्ये आपले मराठी कलाकार सुद्धा मागे राहिले नाहीत.

राजा शिवछत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी यांसारख्या मालिकांमधून आपल्या मनात एक आदराचे स्थान निर्माण करणारे कलावंत डॉ अमोल कोल्हे नेहमीच समाजाचा विचार करत असतात. फक्त एक कलाकार म्हणून नाही तर, माणुसकीच्या नात्याने आणि आपण समाजाचे काही देणं लागतो, याचा विचार करत डॉ अमोल कोल्हे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आणि ही मदत कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आणि आपल्या सुरक्षते साठी दक्ष असणाऱ्या पोलिसांना केली आहे.  कोरोनाविरुद्ध जनजागृती करणाऱ्या पोलिसांना सुद्धा कोरोना विषाणूची लागण होत असल्यामुळे, डॉ अमोल कोल्हे यांच्या जगदंब प्रतिष्ठान च्या साहाय्याने पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना, वैद्यकीय किटचे वाटप केले आहे. डॉ अमोल कोल्हे एक कलाकारासोबत शिरूर लोकसभेचे खासदार सुद्धा आहेत. आणि या बिकट परिस्थितीमध्ये रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी या साऱ्यांना जगदंब प्रतिष्ठान चा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. आणि आताच्या या गंभीर परिस्थिती मध्ये सुद्धा अमोल कोल्हे आणि त्यांचे सहकारी जमेल तशी मदत करत आहे. 


एक कलाकार म्हणून आपण प्रेक्षकांचे मनोरंजन तर करत असतोच, पण त्याच सोबत सगळ्यात आधी आपण एक समाजाचा भाग सुद्धा असतो. याची जाणीव प्रत्येक कलाकाराला आहे. आणि याच गोष्टीचं भान राखत डॉ अमोल कोल्हे यांनी पुढे केलेला मदतीचा हात कित्येक पटीने महत्वाचा आहे. अस बोलायला काही हरकत नाही.