कोरोनाची वाढत चाललेल्या धास्तीमुळे सारेजण चिंतेत आहेत. आणि आताच्या या बिकट परिस्थितीमुळे सारेजण आपल्या घरामध्ये लॉकडाऊन झाले आहेत. आणि आपल्या प्रमाणे, आपले मराठी कलाकारसुद्धा त्याच्या या वेळेचा सदुपयोग करण्यामध्ये  मागे नाही राहिलेत. सारेजण नेहमीच काही तरी नवं नवीन आपल्या समोर सादर करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत.

 याच दरम्यान वास्तवादी अभिनेता जितेंद्र जोशी याने त्याच्या वेळचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केला आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे कि, जितेंद्र जोशी हा एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याच सोबत जितेंद्र हा एक उत्तम कवी सुद्धा आहे. आणि जितेंद्रने वेळोंवेळी त्याच्या अनेक कविता आपली समोर सादर सुद्धा केल्या आहेत. नेहमीच आपल्या कडून प्रेक्षकांना काही तरी देण्याच्या प्रयत्नामध्ये असणारा जितेंद्र जोशी नेहमीच आपल्या समोर नवं - नवीन गोष्टी घेऊन येत असतो. आणि आताच्या लॉकदाउंसाच्या काळात सुद्धा जितेंद्रने आपल्यासमोर मराठी साहित्यामधील कविवर्य बा. भा. बोरकर यांच्या 'आता विसाव्याचे क्षण' या कवितेचं वाचन केलं आहे. नुकतंच जितेंद्र जोशीने  त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हि विडिओ शेअर केली आहे. आणि खूप कमी वेळातच या विडिओला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. 


एक गुणी अभिनेता, कर्तव्यदक्ष नागरिक आणि हौशी कलाकार अशी ओळख असलेला जितेंद्र जोशीने   त्याच्या अभिनयाच्या जोरावर, विनोदाचं अचूक टायमिंग आणि आपला दमदार आवाज या सगळ्यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मानत एक घर बनवले आहे. यापुढे  सुद्धा जितेंद्र जोशी आपल्या सगळ्यांसाठी काही तरी नवीन घेऊन येईल यामध्ये काही वाद नाही.