प्रत्येक कलाकार हा अभिनया व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कामात तरबेज असतो. काही कलाकार ते काम छंद म्हणून जोपासतात तर काही जण एक आवड म्हणून, आणि अशीच आवड जोपासली आहे, मराठी चित्रपट सृष्टीमधील अभिनेत्री उर्मिला कोठारे या अभिनेत्रीने.

कलाकार मंडळी आपल्या कामाप्रमाणेच इतर गोष्टींमध्ये सुद्धा पारंगत असतात. मग ते चित्र काढणं असो, कविता लिहिणं असो किंवा जेवण बनवणं सारेजण आपल्या कामाला घेऊन खूप चांगल्या पद्धतीने हौशी असतात. शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून स्वतःसाठी वेळ काढत हे कलाकार त्यांचा हा छंद जोपासतात. उर्मिला कोठारेमध्ये सुद्धा अभिनयाव्यतिरिक्त एक गुण आहे. आपल्या सगळ्या माहित आहे कि, उर्मिला अनेक खूप सुदंर नृत्यांगना आहे आणि त्या व्यतिरिक्त उर्मिला खूप चांगली कथ्थक डान्सर सुद्धा आहे. एवढंच नाही तर उर्मिला सध्या लॉकडाउनच्या काळात घरबसल्या कथ्थकचा सुद्धा रियाज करत आहे. नुकतंच उर्मिलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा कथ्थकचा रियाज करतानाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचसोबत उर्मिला  'एरियल सिल्क' या नृत्याच्या प्रकारामध्ये सुद्धा पारंगत आहे. हा नृत्यप्रकार बघायला जेवढा रोमांचक वाटतो, त्यापेक्षा खूप जास्त पटीने अवघड आहे. कारण हा नृत्यप्रकार साकारत असताना, शरीराची लवचिकता आणि एकाग्र बुद्धिमत्ता तेवढिच कमालीची लागते.आपल्या अभिनयामधून प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या प्रयत्नामध्ये असणारी अभिनेत्री उर्मिला कोठारे अभिनयासोबत तिची हि आवड सुद्धा जोपासत आहे. आणि त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने  पारंगत सुद्धा आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.