कोरोनाची वाढत चाललेल्या धास्तीमुळे सारेजण चिंतेत आहेत. आणि आताच्या या बिकट परिस्थितीमुळे सारेजण आपल्या घरामध्ये लॉकडाऊन झाले आहेत. आणि आपल्या प्रमाणे , आपले मराठी कलाकारसुद्धा त्याच्या या वेळेचा सदुपयोग करण्यामध्ये  मागे नाही राहिलेत. सारेजण नेहमीच काही तरी नवं नवीन आपल्या समोर सादर करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. आणि खूप वेळा त्यांच्या या प्रयत्नांना प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळते.

असाच काहीसा नवीन आणि खट्याळ उपक्रम सुरु केला आहे प्रसाद ओक या अभिनेत्याने, एक उत्तम दिग्दर्शक आणि विनोदाची जाणं असलेला हा कलाकार घरी राहून कोरोनाविरुद्ध त्याच्या मिश्किल लेखणीमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आणि त्याच्या या विनोदबुद्धीला लॉकडाउनच्या काळात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण प्रसाद ओक त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकापेक्षा एक भन्नाट पोस्ट करत त्याच्या चाहत्यांना आणि कलाकारांनाही खळखळून हसवलंय. नुकतीच त्याने एक पोस्ट केली आहे.  "आयुष्य आर्ट फिल्म सारखं झालंय, चालू आहे हे कळतंय...  पण नक्की काय चालू आहे ते मात्र कळतं नाहीये." प्रसाद ओकच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी त्याचं कौतुक करत कंमेंट्स सुद्धा केल्या आहेत. त्याचं सोबत प्रसाद ओकने, आजकाल बायका एकंच गाणं मनातल्या मनात गुणगुणतायत म्हणे.. 'जीवनात हा "गडी"  असाच राहू दे' अशी अजून एक मिश्किल पोस्ट केली आहे. आपला उत्तम अभिनय, कच्चा लिंबू आणि हिरकणी सारख्या चित्रपटामधून आपल्यासमोर सादर केलेली दिग्दर्शकाची एक बाजू, आताच्या कोरोनासारख्या भयाण वातावरणामध्ये सुद्धा आपल्या हजरजबाबी पणा आणि विनोदबुद्धी या साऱ्याची सांगड घालत प्रसाद ओक आपले आणि समस्त मराठी कलाकारांचे मनोरंजन करत आहे, यामध्ये काही वाद नाही.