शिकारी चित्रपटामधून आपलं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत नेहा खान हिने आपला एक वेगळा चाहता वर्ग बनवला आहे. तिचा अभिनय तिच्या घायाळ करणाऱ्या अदा आणि तीच मोहक रूप या सगळ्या गोष्टींनी मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आणि आता हीच अभिनेत्री तिच्या फोटोशूट मधून एप्रिल हिट वाढवण्याचे काम करत आहे.

विजू माने दिग्दर्शित, शिकारी या चित्रपटामध्ये आपल्या अदा दाखवत, नेहा खानने सगळ्यांना घायाळ केलं. चित्रपटामधील तिची बोल्ड भूमिका, तिची मादक नजर या साऱ्या गोष्टींच्या जोरावर हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला. आणि तिच्या या बोल्ड अंदाजामुळे ती प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय सुद्धा बनली. नेहा तिच्या इंस्टाग्राम पेज वर खूप चांगल्या पद्धतीने सक्रिय आहे. आणि दरवेळेला याच माध्यमातून नेहा तिच्या चाहत्यांसोबत संवाद सुद्धा सादते. नुकतंच तिने तिच्या इंस्टाग्राम पेज वर फोटोशूट मधील काही फोटोस शेअर केले आहेत. ब्लॅक आऊटफिट मधील या फोटो वरून एप्रिल हिट वाढल्याचा अंदाज येत आहे. आणि या फोटोस मधून तिचा ग्लॅमर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने निखरून आला आहे. आपल्या प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या प्रयत्नामध्ये असणारी अभिनेत्री, नेहा खान नेहमीच तिच्या इंस्टाग्राम पेज वरून तिचे फोटोज किंवा व्हिडिओ शेअर करत असते. शिकारी नंतर झी ५ च्या काळे  धंदे या वेबसिरीज मधून नेहा आपल्या भेटीला आली. आणि झी युवाच्या "युवा डान्सिंग क्वीन" मधून सुद्धा आपल्या नृत्याची झलक सगळ्या प्रेक्षकांसमोर सादर केली.