सध्या कोरोनाच्या वाढत्या धास्तीमुळे आपण सारेजण आपल्या घरामध्येच लॉकडाऊन झाले आहोत. आणि याचा परिणाम सगळ्याच क्षेत्रावर झाला आहे. आणि या संकटापासून वाचण्यासाठी पोलिस खाते, अग्निशामक दल, डॉक्टर्स, सफाई कामगार आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे कामगार हे सारेजण त्यांचा संपूर्ण वेळ आपल्यासाठी खर्च करत आहे.

आणि कोरोनाबद्दल जनजागृती करण्याच्या पार्श्वभूमी वर मुंबई पोलिस खात्याने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. आणि ते म्हणजे पोलीस खाते आता, इंस्टाग्राम सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर उतरले आहे. नुकतंच मुंबई पोलीसने त्यांचं ऑफिशल इंस्टाग्राम पेज सुरु केलं आहे. आणि मुंबई पोलीसच्या या पेजने खूप कमी वेळातच हजारोंचे फॉलोवर्स बनवले आहेत. कोरोना बाबतची जनजागृती कारण्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी उचलले हे पाऊल खूप जलदरीत्या सगळीकडे पसरत आहे. आणि सध्या इंस्टाग्रामवर याच पेजची हव्वा होत आहे. मुंबई पोलिंसांच्या या पेजवर चित्रपटांमधील काही फोटोंचा वापर करून, कोरोना बाबत जनजागृती करत आहे.


मुंबई पोलिस सुद्धा आता खूप चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. आणि इंस्टाग्रामवर बनलेलं ऑफिशल पेज हे त्याचंच एक उदाहरण आहे. मुंबई पोलिसांचं हे पाऊल सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल आणि कोरोनाबद्दलची जनजागृती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होईल यामध्ये काही वाद नाही.