प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार लपलेला असतो, आणि प्रत्येक कलाकारांमध्ये एक लपलेला गुण जो फक्त त्यालाच माहित असतो. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा असे खूप सारे कलाकार आहेत, जे फक्त अभिनयच करत नाही, तर या व्यतिरिक्त ते अनेक छंद जोपासतात. आणि हेच छंद त्यांचे कलागुण म्हणून आपल्या समोर सादर करतात. 

असाच एक उत्तम गीतकार, एक लेखक आणि एक अभिनेता म्हणजे गुरु ठाकूर, गीतकार म्हणून सगळीकडे नावाजलेला गुरु ठाकूर एक चित्रकार सुद्धा आहे. आणि त्याचा हा छंद त्याने खूप चांगल्या पद्धतीने जोपासला आहे. अनेक मराठी चित्रपट, मालिका, नाटक यासाऱ्यामध्ये आपल्या शब्दांनी जीव ओतणार गुरु ठाकूर, त्याच्या पेंटिंग ब्रशचा सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने वापर करतो.'वेदनांचे वावडे नसते, परंतु चेहेरा सांभाळताना धाप लागते'.  यांसारख्या कविता करणारा गुरु ठाकूर, त्याचे विचार चित्रांद्वारे आपल्या समोर सादर करत असतो. त्याच्या या चित्रकलेची आवड, हि त्याच्या इंस्टाग्राम पेज वरून सुद्धा दिसून येते. आपल्या आई वडिलांच्या चित्रपपासून ते अगदी नसरुद्दिन शहा यांचं चित्रसुद्धा गुरु ठाकूरने त्याच्या ब्रशच्या मदतीने पूर्ण केले आहे. चित्रकलेच्या जोडीला गुरु ठाकूरला फोटोग्राफीची सुद्धा आवड आहे. आणि याबाबतचे अनेक फोटो त्याने इंस्टाग्राम पेज शेअर सुद्धा  केले आहे. देवाक काळजी रे, इंद्रधनू, गुलाबाची कळी यांसारख्या गाण्यांना शब्दबद्ध करणारा गुरु ठाकूर, एक उत्तम चित्रकार आणि एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा आहे. आणि दरवेळेला गुरु ठाकूर आपल्या समोर काही तरी नवीन घेऊन येईल यामध्ये सुद्धा काही वाद नाही.