सध्या कोरोनामुळे सगळी कडे भीतीच सावट पसरलं आहे.  आणि याची झळ सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना लागली आहे. मग ते राजकीय क्षेत्र असो किंवा अजून कोणतं, सारेजण आपल्या घरी लॉकडाऊन झाले आहेत. पण आपल्याला मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग आपल्याला कसा करता येईल हे  मात्र आपल्या पाहत आहे. आणि नेहमी प्रमाणे आपला मराठी कलाकार सुद्धा यामध्ये मागे राहिला नाही. आपले सारेच कलाकार त्याच्या घरी राहून सुद्धा आपलं मनोरंजन करत आहे. फक्त प्रत्येकाची पद्धत तेवढी वेगळी आहे.

याच दरम्यान मराठी मधील एक गुणी आणि परभणीचे शान असलेला संकर्षण कऱ्हाडेनी त्याच्या इंस्टाग्राम  अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बघायला जेवढी मज्जा आहे त्यापेक्षा जास्त, हा व्हिडिओ ऐकायला खरी गंमत आहे. कारण या व्हिडिओ मध्ये संकर्षणने एक पत्र लिहिले आहे. आणि याच पत्राचं वाचन त्याने आपल्या साठी केलं आहे. प्रत्येक कलाकारासाठी कोणी ना कोणी, एक आदर्श असतो. असाच एक आदर्श संकर्षण साठी सुद्धा आहे, आणि त्याने हे पत्र त्याच साठी लिहिले आहे. बॉलीवूड मधील शहेनशाह, अमिताभ बच्चन यांसाठी संकर्षणने हे पत्र लिहिले आहे.  ९ मिनिटांच्या या पत्रामध्ये संकर्षणने, अमिताभ बच्चन यांसाठी असणारा आदर आणि कामाच्या प्रती असणारी त्यांची एकनिष्ठता यासाऱ्या गोष्टीच कौतुक केलं आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला, त्याच्या कामाला, त्याच्या जिद्दीला आणि त्याच्या मेहनतीला मानाचा मुजरा करत संकर्षणने  हे पत्र लिहिले आहे. आणि त्याचे वाचन आपल्या समोर केले आहे. 


आपल्या अभिनयातून, कवितेमधून आणि विनोदाच्या अस्सल टायमिंग वरून हसवत ठेवणारा संकर्षण नेहमीच काही तरी वेगळं आपल्यासमोर सादर करतो. आणि त्याच अमिताभ बच्चन यांसाठी लिहिलेलं हे पत्र सुद्धा त्यामधील एक भाग आहे.