कोरोनाच वाढत सावट आणि यांमुळे घरामध्ये बंद झालेला आपण, या साऱ्या गोष्टीमुळे आपल्याकडे भरपूर वेळ उपलब्ध आहे. आणि या वेळेचा कश्यापद्धतीने आपण वापर करू शकतो हे सार काही आपल्या वर अवलंबून आहे. या वेळेमध्ये आपण आपण आपला छंद जोपासू शकतो, किंवा आपला संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला देऊ शकतो. या लॉकडाउनच्या काळात आपले मराठी कलाकार सुद्धा या वेळेचा उपयोग, खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. काही कलाकार योगा करत आहेत, तर काही कलाकार घरामध्ये राहून वेगवेगळ्या पद्धतीने कोरोना बाबत जनजागृती करत आहे.

याच दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीमधील एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांची पत्नी मंजिरी ओक सुद्धा, तिच्या या वेळेचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने करत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर मंजिरीने तिचा संपूर्ण वेळ हा नवं नवीन खाद्यपदार्थ बनवण्यासाठी दिला आहे. आणि मंजिरीच्या या साऱ्या कलाकृती आपल्याला तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर बघायला मिळत आहे. मंजिरी नेहमी काही तरी नवीन आणि वेगवेगळ्या प्रांतांमधील डिशेस बनवत असते. ज्यामध्ये आसामी चहा, अरुणाचलचा राईस खर्जी, पंजाबी बटर चिकन, आंध्र प्रदेश ची दोंडकाय फ्राय, हिमाचल प्रदेशचे पटांडे, वेस्ट बंगालची मिष्टी दोई यांसारख्या वेगवेगळ्या डिशेस बनवत आहेत. मंजिरी या डिशचा फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना, प्रत्येक डिश सोबत एक भन्नाट असं कॅप्शन सुद्धा देत आहे. मिझोराम, हैद्राबाद ते चक्क केरळ, उत्तराखंड पर्यंत या साऱ्या प्रांतांमधील नवं नवीन खाद्यपदार्थ मंजिरी बनवत आहेत. नुकतंच मंजिरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तेलंगणाची प्रान्स करी आणि रुमाली रोटी या डिशचा व्हिडिओ, जेवण जेवावं कसं, नीट घालून मांडी, सोबत आहे खास डिश, तेलंगणा ची रुमाली रोटी आणि सर्वपिंडी असं भन्नाट कॅप्शन देत शेअर केला आहे.कलाकार म्हणून प्रसिद्ध असणारी मंजिरी, एक गृहिणी म्हणून सुद्धा सर्वगुण संपन्न आहे. आणि मंजिरी तिच्या वेळेचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने करत आहे, एवढं मात्र खरं..