एक कलाकार म्हणून आपण या समाजाचे काही तरी देणं  लागतो. आणि आताच्या कोरोना सारख्या भयाण परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी जपून काम करणे हे साऱ्यांचे कर्तव्य आहे. आज आपण सारेजण आपल्या घरामध्ये राहून कोरोनाविरुद्ध दोन हात करत आहोत. आणि आपल्याजोडीला सगळ्याच क्षेत्रामधील माणसे सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. मग त्यामध्ये राजकीय क्षेत्र असो किंवा मनोरंजन क्षेत्र सारेजण त्यांना जशी होईल तशी मदत करत आहे..

कोरोनामुळे जरी आपण लॉकडाऊन झाले असलो तरी सुद्धा, आपले मराठी कलाकार आपल्या मनोरंजनासाठी नेहमी काही तरी नवीन आपल्या समोर सादर करत असतात. मग त्यामध्ये वर्कआऊट असो किंवा घर बसल्या कुकिंगचे धडे सारे जण त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं सगळं काही करत आहे. यामध्येच मराठी चित्रपटश्रुष्टी आणि रंगभूमीवरील अभिनेत्री भक्ती देसाईने एक भन्नाट व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे. तू म्हणशील तस या नाटकाची प्रस्तुती करणाऱ्या, पुणे टॉकीज या पेजने एक नवीन ट्रेंड सुरु केला आहे. आणि तो ट्रेंड म्हणजे,  तुम्हाला आवडणारी एका कवितेचे वाचन करतानाच व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेज वर शेअर करत, #कवितामाझीआवडीची आणि #TuMhanshilTasa हे दोन हॅशटॅग वापरायला सांगितले आहे. पुणे टॉकीजचा हा नवा ट्रेंड खूप चांगल्या पद्धतीने सगळी पसरत आहे. आणि नुकतंच भक्ती देसाईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर कवी कुसुमाग्रजांची, पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेचे वाचन करतानाच व्हिडिओ शेअर केला आहे. आणि खूप कमी वेळात या ट्रेंडला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. 


कलाकार म्हणून, प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या प्रयत्नामध्ये असताना,पुणे टॉकीजने एक वेगळाच आणि भन्नाट ट्रेंड सुरु केला आहे. आणि खूप कमी वेळातच हा ट्रेंड सगळीकडे पसरून आपल्याला नवीन कवितांना ऐकायला मिळतील या मध्ये काही वाद नाही.