आपण सारेजण कोरोनासारख्या मोठ्या संकटाला तोंड देत आहोत. सगळ्याच क्षेत्रामधील व्यक्ती आपल्याला कोरोना पासून स्वतःचे रक्षण कसे करू शकतो याबद्दलची जनजागृती करत आहेत. आणि यासाऱ्या मद्धे आपले मराठी कलाकार सुद्धा त्यांचा वेळ आपल्यासाठी देत आहेत. काही कलाकार योगासनाचे धडे देत आहेत, तर काही कलाकार घरी राहून आपले मनोरंजन करत आहेत.

यामध्ये मराठी चितपटश्रुष्टीमधील आघाडीची सुंदर अभिनेत्री, आणि एक उत्कृष्ट कवियत्री स्पृहा जोशीने तिच्या इंस्टाग्राम पेज वर एक विडिओ शेअर केला आहे. आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी स्पृहा एक कवियत्री असून, तिच्यामधील हा गुण सगळ्यांच्या ओळखीचा आहे. स्पृहा नेहमी तिच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज वर तिच्या कविता पोस्ट करत असते. आणि तिचे चाहते सुद्धा, टिकच्या या कवितांना  खूप चांगल्या पद्धतीने  दाद देतात. नुकतंच स्पृहाने तिच्या इंस्टाग्राम पेज वर इतकेसे डोळे तरीही हि  कविता शेअर केली होती. आणि तिच्या या कवितेचे रूपांतर गाण्यामध्ये करण्यात आले आहे. गीत दिग्दर्शक अद्वैत सावंत याने केले असून, या गाण्याला निनाद भट याने आवाज दिला आहे. स्पृहाची कविता, निनादच्या आवाजाने अजून खुलून आली आहे. खूप कमी वेळातच या कवितेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


कोरोनाविरुद्ध लढत असताना घर बसल्या आपले मनोरंजन कसे करता येईल, या खटपटीमध्ये सारे मराठी कलाकार लागले आहेत. आणि दरवेळेला आपला मराठी कलाकार आपल्यासाठी काही तरी नवीन आणि काही तरी वेगळं घेऊन येत आहे. आणि आता स्पृहाने केलेला हा प्रयत्न सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना आवडत आहे, एवढं मात्र नक्की