सध्या कोरोनाच्या वाढत्या धास्तीमुळे आपण सारेजण आपल्या घरामध्येच लॉकडाऊन झाले आहोत. आणि याचा परिणाम सगळ्याच क्षेत्रावर झाला आहे. आणि या संकटापासून वाचण्यासाठी पोलीस खाते, अग्निशामक दल, डॉक्टर्स, सफाई कामगार आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे कामगार हे सारेजण त्यांचा संपूर्ण वेळ आपल्यासाठी खर्च करत आहे. 

आपण जरी घरात बसून असलो, तरी सुद्धा घराच्या बाहेर मात्र या क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी दिवस रात्र एक करून आपल्या सुरक्षतेसाठी झगडत आहे. यासाऱ्या मध्ये एक वर्ग मात्र डोळ्यात तेल घालून आपली सेवा करत आहे आणि ते म्हणजे पोलीस खाते, स्वतःच्या घरामधून बाहेर येऊन आपल्या स्वरंक्षणासाठी काम करणारे पोलीस खाते नेहमी आपल्यासाठी तयार असतात. आणि कोरोनाविरुद्ध जनजागृती करत असतात. आणि याच पोलिसांच्या सुरक्षेसाठी, मुंबईच्या एका तरुणाने एक वेगळीच शक्कल लढवली आहे. ठाणेमध्ये  राहणाऱ्या आशुतोष नायक या तरुणाने, खास पोलिसांसाठी घरामध्येच सॅनिटायझर हँड पंप बनवला आहे. नेहमी रस्त्यावर फिरत असताना पोलीस अनेक वेळा, इतर माणसांच्या संपर्कात येत असतात. आणि दार वेळेला त्यांना सॅनिटायझरचा वापर करण शक्य नसल्यामुळे आशुतोषने हा हँड पंप बनवला आहे. आणि हा पंप अगदी सहजपने पोलिसांच्या पट्याखाली अडकवू शकतो. पोलिसांच्या सुरक्षेसाठी आशुतोषने उचलेले  हे पाऊल खूपच कौतुकास्पद आहे. 


आपल्या परीने केलेला एक लहान प्रयत्नसुद्धा पोलिसांना कोरोनासारख्या या भयानक संकटापासून  वाचवू शकतो. जो माणूस आपल्यासाठी सदैव तत्पर उभा आहे. त्याच्या सुरक्षतेची जवाबदारी आपण घेणं गरजेचं आहे. आणि कोरोना विरुद्ध असणार हे युद्ध आपण घरामध्येच राहून जिंकू शकतो याच भान राखणसुद्धा तेवढच महत्वाचं आहे.