सध्या आपण सारेजण, कोरोनासारख्या मोठ्या संकटाला तोंड देत आहोत. आणि हे एक असं युद्ध आहे जे आपण घरी राहूनच जिंकू शकतो. आणि याची सुरवात आपण सगळ्यांनी केली आहे,  सारेजण त्यांच्या परीने, कोरोना बाबत जनजागृती करत आहेत. आणि यामध्ये आपले मराठी कलाकार सुद्धा मागे राहिले नाही. या कोरोनापासून स्वतःला वाचवण्यासाठी काही कलाकार आपल्याला योगाचे महत्व तर काही कलाकार हेल्दी डायट आपल्या शरीराला कसा उपयोगी आहे याचे महत्व सांगत आहे.

याच दरम्यान झी मराठी वाहिनीवरील आघाडीचे आणि सगळ्यांच्या पसंदीच्या कलाकारांनी म्हणजेच अनिता दाते, तेजस बर्वे आणि अमृता धोंगडे यांनी एक गाणं सादर केलं आहे. कोरोना विरुद्ध लढाई करताना  आपणं घरीच राहून त्यःचय वर मात करू शकतो. आणि सारेजण मिळून कोरोना  हरवू शकतो असे आव्हान या तीन कलाकारांनी आपल्यासमोर सादर केले आहे. We can We Will हे गाण्याचं शीर्षक आहे. नुकतंच  अनिता, तेजस  आणि अमृताने सुद्धा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे गाणे शेअर केले आहे. खूप कमी शब्दामध्ये या तीन कलाकारांनी आपल्याला एकजुटीचे महत्व  पटवून देत. कोरोना विरुद्ध  लढण्याची नवीन उमेद आपल्यासमोर सादर केली आहे. सारे मराठी कलाकार त्याच्या परीने, कोरोना विरुद्ध जनजागृती करण्याचे धडे आपल्याला देत आहेत. सारेजण वेगवेगळ्या आणि इंटर्स्टिंग पद्धतीने  जनजागृती करत आहे. राधिका सुभेदार, समर पाटील आणि आपली सुमी या साऱ्यांचा हा प्रयत्न खूप कमी वेळातच सगळ्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.