सध्याच्या परिस्थितीमध्ये सारेजण आपल्या घरी लॉकडाऊन झाले आहेत. आणि याच लॉकडाऊनच्या काळात राजकीय, क्रीडा या क्षेत्रामधील सारेजण आपल्या घरी राहून आपल्या परीने त्यांच्या वेळेचा योग्य तो वापर करत आहेत. आणि यामध्ये सुद्धा आपले मराठी कलाकार मागे राहिले नाहीत, काही जण या काळात स्वतःच्या फिटनेस वर लक्ष देत आहेत, तर काही जण स्वतःच कुकिंग स्किल सुधारत आहे. हा पण एक गोष्ट मात्र यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिसून येते ती म्हणजे आपले मराठी कलाकार जी कोणती गोष्ट करत आहे, ते सगळं काही एका वेगळ्या अंदाजात करत आहे.

याच दरम्यान मराठी चित्रपट श्रुष्टीमधील आघाडीचा दिग्दर्शक समीर विध्वंस याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर त्याचे गाण्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर आपल्यापरीने, आपण प्रेक्षकांना काय देऊ शकतो ? ज्यामुळे त्यांचे घर बसल्या मनोरंजन होईल. याचा विचार करत समीरने हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. ज्यामध्ये समीर जुण्या गाण्यांना उजाळा देत या व्हिडिओ शूट करून त्याच्या अकाऊंवर शेअर करत आहे. फक्त गाणीच नाही तर कवितांचे वाचन करतानाचा व्हिडिओ सुद्धा समीरने शेअर केला आहेत. नुकतंच त्याने कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचं वाचन करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आणि त्याच्या या उपक्रमाला सगळ्यांकडून खूप चांगल्या पद्धतीने दाद मिळत आहे. एक कलाकार, एक दिग्दर्शक आणि समाजामधील एक घटक म्हणून आपण समाजाचे देणं लागतो. आणि आताच्या कोरोनासारख्या मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी आपण सारेजण तयार आहोत. याच दरम्यान आपले मराठी कलाकारसुद्धा त्यांच्या परीने कोरोनाबद्दल जनजागृती करत आहे. आणि या साऱ्यावर एक हास्याची आणि विरंगुळेची फुंकर म्हणून समीर विध्वंसने जुन्या गाण्यांची एक गोड मैफिल आपल्या समोर सादर केली आहे.