जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे, आणि याचा संपूर्ण परिणाम आपल्या रिजच्या जीवन शैलीवर झाला आहे. पण यापासून आपण स्वतःचे रक्षण कसे केले पाहिजे याबद्दलची जनजागृती सारेजण करत आहेत. मग यामध्ये राजकीय क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र सारेजण आपल्या परीने कोरोना विरुद्ध आवाज उठवत आहे. 

आणि यामध्ये सुद्धा आपले मराठी कलाकार मागे राहिले नाहीत, फक्त मनोरंज न करता, आपण या समाजाचे  काही देणं लागतो या गोष्टीची भान राखत सारे मराठी कलाकार आपल्याला वेगवेळ्या पद्धतीने  कोरोना विरुद्ध लढण्याची शक्कल सांगत आहेत. याच दरम्यान मराठी मधील एक गोड़ आणि गुणी अभिनेत्री मिथिला पालकरने, योगा करतानाचे हॉट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहे. खूप कमी वेळातच तिच्या या फोटोंनी लाखभराचा टप्पा पार केला आहे. त्याचा सोबत तिला अनेक मराठी कलाकारांकडून कंमेंट्सने दाद सुद्धा  मिळाली आहे. मिथिला नेहमीच प्रेक्षकांना तिच्या अभिनयाने आणि तिच्या कलागुणाने चकित करून ठेवते. आणि आताच्या या लॉकडाऊनच्या काळात तिचे हॉट योगाच्या फोटोंची चर्चा  सगळी कडे झाली आहे.

युट्युब वरून सुरवात करत, खूप कमी वेळातच मिथिलाने मराठी चित्रपटश्रुष्टि मध्ये आपले पाय रोवले आहेत. अमेय वाघ सोबत मुरांबा या चित्रपटामधून पदार्पण करत, साऱ्यांची लाडकी मिथिलाने तिचा एक वेगळाच चाहता वर्ग बनवला आहे. आणि त्याच सोबत मिथिला अनेक हिंदी वेबसिरींजमधून सुद्धा  आपल्याला दिसली आहे.