कोरोना सारख्या मोठ्या संकटाला आपण सारेजण मिळून तोंड देत आहोत. आणि यामध्ये आपल्या सोबत आपले मराठी कलाकार सुद्धा त्यांच्या परिने मदत करत आहे. काही कलाकार घरात राहून, योगा शिकवत आपण आपली रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल याबद्दल सांगत आहेत, तर काही कलाकार घरातूनच वेगवेगळ्या पद्धतीने कोरोनाच्या बाबतीत जनजागृती करत आहे. 

अशीच एक शक्कल लढवली आहे विजू माने या दिग्दर्शकाने,  विजू माने याने, त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर एक गाणं शेअर केलं आहे. आणी ते गाणं म्हणजे, 'घे जवाबदारी' प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या या कलाकाराने हे गाणं आपल्या समोर सादर केले आहे. सध्या जगभर कोरोनाचे सावट पसरले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपण स्वतः घरी राहून या कोरोनाला दूर करू शकतो. आणि याची जवाबदारी आपण घेतली पाहिजे. यावर या गाण्याचे बोल लिहिले गेले आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे, या गाण्यात २१ देशांतून, २१ मराठी माणसे आणि २१ मराठी कलाकार सारेजण एकाच वेळी आपल्याला दिसणार आहे. आणि सगळेजण आपल्याला घरी राहण्याचा संदेश देत आहेत. ज्यामध्ये अंकुश चौधरी, मृण्मयी देशपांडे,  कुशल बद्रिके, प्रिया बापट, भाऊ कदम  आणि जितेंद्र जोशी सोबत अनेक मराठी कलाकार, आणि २१ मराठी भाषिक माणसांचा समावेश आहे. गाण्याचे दिग्दर्शन विजू माने यांनी स्वतः केले असून, अभिजित कोसंबी, नेहा राजपाल, अनुराग गोडबोले, चिन्मय हुल्याळकर, रुपाली मोघे आणि तन्यमी भिडे यांनी हे गाणे गायले आहे.  आपण सारेजण कोरोनाला घरी राहूनच हरवू शकतो. आणि याची जवाबदारी आपण सगळ्यानी घेतली पाहिजे, असा संदेश या गाण्यातून आपल्याला दिला आहे. विजू मानेचा हा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे रंगला आहे. आणि खूप कमी वेळातच त्यांच्या या व्हिडिओला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.