कोरोना पासून आपला बचाव कसा करता येईल, आणि या क्वारंटाइन मध्ये आपण काय करायचं, काय करायचं नाही हे सारं काही आपल्याला सगळ्यानी सांगितलं आहे. ज्यामध्ये राजकीय, क्रीडा, मनोरंजन सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्याला सांगितले आहे. आणि यामध्ये आपले काही मराठी कलाकार चित्र काढताना, काही योगा करताना तर काही स्वयंपाक शिकताना दिसत आहे. 

आपले मराठी कलाकार, नेहमीच त्यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट वर खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह असतात. आणि सारेजण आपल्याला त्यांच्या रोजच्या दिनक्रमाबद्दल अपडेट देत असतात. असाच काहीसा गमतीशीर अपडेट आपल्या एका मराठी कलाकारानी त्याच्या फेसबुक मार्फत आपल्याला दिल आहे. आणि तो कलाकार म्हणजे गश्मीर महाजनी, गश्मीरने त्याच्या फेसबुक अकाउंटवर ( खरा मी खोटा मी ) हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये गश्मीरने कोरोनामुळे क्वारंटाइन असताना काय, काय केले हे सारं काही सांगितलं आहे. पण या मध्ये एक वेगळाच ट्विस्ट आहे. आणि तो म्हणजे त्याने ५ अश्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या त्याने कधीच केल्या नाही. आणि या व्हिडीओला खरा मी, खोटा मी अस भन्नाट कॅप्शन देत. हा व्हिडिओ फेसबुक वर शेअर केला आहे. कोरोना सारख्या गंभीर परिस्थिती वर गश्मीरने हा व्हिडिओ पोस्ट करत,  त्याच्या परीने एक हास्यास्पद फुंकर घातली आहे. आणि त्याच्या या व्हिडिओला प्रेक्षकांकडून सुद्धा खूप साऱ्या लाइक्स आणि कंमेंट्स मिळत आहे.