‘काहे दिया परदेस’ या मालिकेत शिव आणि गौरी यांची भूमिका साकारणारी जोडी ऋषि सक्सेना आणि सायली संजीव ही संपूर्ण महाराष्ट्राची फेव्हरेट जोडी बनली होती आणि अजूनही त्यांच्या जोडीची चर्चा सोशल मिडीयावर होतच असते. आता या चर्चेत आणखी भर पडणार असून प्रेमाची नव्याने चाहूल लागणार, जीव होणार लाजीरा कारण या गोड, नटखट आणि प्रेमळ जोडीवर आधारित रेड बल्ब म्युझिकचे ‘लाजीरा’ हे लव्ह साँग प्रदर्शित झाले आहे. 

सायली संजीव आणि ऋषी सक्सेना या दोघांचा वेगळा लूक आपल्याला या गाण्यात बघायला मिळत आहे. नवीन लग्न झालेले जोडपं आणि मग त्यादोघांचं बहरत जाणार नातं या साऱ्या गोड गोष्टींची सांगड या गाण्यामध्ये घातली गेली आहे.सायली संजीवने तिच्या इन्स्ट्राग्राम अकाउंट वर सुद्धा या गाण्याचा फोटो शेअर केला आहे. गाण्याचे बोल, विपुल घंगाळे यांनी लिहिले असून, केवल वाळंज आणि विकास विश्वकर्मा यांनी संगीत दिले आहे. त्याचसोबत केवल वाळंज आणि स्नेहा महाडिक यांनी गाण्याला आवाज दिला आहे. काहे दिया परदेस नंतर पुन्हा एकदा सायली आणि ऋषी या दोघांची केमिस्ट्री आपल्याला बघायला मिळणार आहे. ‘रेड बल्ब म्युझिक’ हे म्युझिक लेबल नुकतेच हे गाणे सोशल मीडियावर लॉन्च केले आहे. ‘रेड बल्ब म्युझिक’ हे म्युझिक लेबल हे पहिलेच गाणे असून, खूप कमी वेळात या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.