सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचे सावट आहे, आपला देश एका अश्या रोगाशी सामना करतोय जो रोग माणसांना माणसापासून वेगळे करतो आणि एवढं सगळं असताना आपले वरिष्ठ, वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती आपल्याशी सवांद साधत आहे,आपल्यला घरी राहण्याचे आवाहन करत आहे. 
आपल्या देशाला कोरोना मुक्त करायचे असेल तर आपल्या सगळ्यांचे एकच कर्तव्य आहे ते म्हणजे घरी थांबणे. एका प्रकारचे हे एक युद्ध आहे आणि युद्धात फक्त घरी बसून राहणं हे इतकं सोप्प काम आपण करूच शकतो. 

बरं, आता तुम्ही घरी आहात हा lockdown चा काळ आपल्या प्रत्येकासाठी कठीण आहे,पण एकदा खरंच मनापासून विचार करून सांगा कि, खरंच इतका कठीण आहे का..?आपल्या रक्षणासाठी दिवस रात्र झटणारे पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, आपल्या सोसायटीचे वॉचमन ह्या सगळ्या लोकांच्या जागी एकदा उभे राहा आणि खरंच विचार करा कि हा lockdown इतका कठीण आहे का..?

अरे मला काही होत नाही.. असे म्हणणारे कदाचित मृत्यू ला घाबरत नसतील पण त्यांना खरंच मरायचं आहे का..? घरी बसून आपण म्हणतोय किती कंटाळा आलाय.. दोन वेळचं जेवण आणि राहायला घर असणाऱ्यांनी तर नक्की एकदा विचार करावा कि एवढं सगळं असताना आणि काय हवंय..?

एवढ्या उन्हात उभे असणारे आपले पोलीस बांधव.. "मला कंटाळा आलाय" असे म्हणाले तर आपण सुरक्षित राहू का..? तुम्ही घरी बसून मोबाईल वर टाईमपास करता, आपल्याकडे मोबाईल आहे, त्याला रिचार्ज आहे बघायला वेबसिरीज आहे,मनोरंजनाच्या इतक्या गोष्टी असताना खरंच एकदा विचार करा कि आणि काय हवंय..? 

असंच विचार करता करता एक कविता सुचली,
itsmajja च्या माध्यमातून ती आज तुमच्यासमोर मांडत आहे,बघा आवडली तर, आणि खरंच एकदा विचार करा एवढं सगळं असताना आणि काय हवंय.?