सध्या संपूर्ण देशाला कोरोनासारख्या भयाण संकटाने वेठीस धरले आहे. आणि या भयाण परिस्थितीमुळे सारेजण आपल्या घरी लॉक डाउन झाले आहेत. आणि या लॉकडाऊन चा फटका सामान्य माणसापासून राजकीय, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रामधील सगळ्यांना लागला आहे. पण या लॉकडाऊन मुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे. आणि ती म्हणजे आपण आपला संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवू शकतो. आणि मनोरंजन म्हणून घर बसल्या आपल्या आवडीच्या वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म्सचा आनंद घेऊ शकतो.

अशीच एक नवी कोरी शॉर्ट फिल्म आपल्या भेटीला येत आहे. या शॉर्ट फिल्म मधून एक नवीन जोडी सुद्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि ती जोडी म्हणजे, हृता दुर्गुळे आणि सुमित राघवन.  नुकतंच Zee5 वर 'स्ट्रॉबेरी शेक' या नवीन शॉर्ट फिल्म चा ट्रेलर शेअर करण्यात आला. आताच्या पिढीमधील मुलगी आणि तिचे कूल बाबा, या दोघांच्या नात्यावर आधारीत, आजच्या काळातील ही शॉर्ट फिल्म येत्या १५ एप्रिल रोजी, Zee5 अँप वर प्रदर्शित होणार आहे. जेव्हा एक साधा सरळ बाबा, स्वतःच्या मुलीसाठी कूल बनण्याचा प्रयत्न करतो. आणि या प्रयत्नांमध्ये सामान्य बाबाची उडणारी तारांबळ हे सारं काही आपल्याला या शॉर्टफिल्म मध्ये बघता येणार आहे. दिग्दर्शक शोनील यल्लातिकर यानेच या शॉर्टफिल्म चे लेखन सुद्धा केले आहे. आजची फास्ट फॉरवर्ड, कोणासाठी ही न थांबणारी तरुण पिढी आणि या तरुणपिढी सोबत स्वतःचा वेग वाढवत, त्यांच्याशी ताळमेळ जुळवून घेणाऱ्या पालकांची ही गोष्ट आहे. नाटक, मालिका, हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये स्वतःला सिद्ध करणारा अभिनेता सुमित राघवन हा बाबांच्या भूमिकेमध्ये तर फुलपाखरू मधून आपल्या सौंदर्याची भुरळ पडणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे ने मुलीची भूमिका निभावली आहे. आणि या दोघांनी सुद्धा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर या नवीन शॉर्ट फिल्मबद्दल एक छोटीशी पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. 'स्ट्रॉबेरी शेक' ही आजच्या पिढीची आणि पालकांची गोष्ट आहे. आजची तरुणाई ही सतत धावणारी, त्यांना जे पाहिजे ते करणारी पिढी आहे. आणि या सगळ्यामध्ये पालकवर्ग स्वतःचा ताळमेळ सांभाळण्याचा प्रयत्न कसा करत आहेत. याच उत्तम उदाहरण आपल्याला या शोर्ट फिल्म मधून दिसून येणार आहे. शोनील यल्लातिकर याचं दिग्दर्शन, सुमित राघवन आणि हृता दुर्गुळे यांसारख्या कसलेल्या कलाकारांचा अभिनय हे सारं काही आपल्याला या शॉर्ट फिल्ममधून बघायला मिळणार आहे.