सध्या सगळी कडे कोरोनाचे सावट पसरले आहे. आणि या कोरोनामुळे सारेजण आपल्या घरामध्ये लॉकडाऊन झाले आहेत. आणि याची झळ फक्त सामाजिक, राजकीय, क्रीडा यांसारख्या क्षेत्रांना नाही तर मनोरंजन क्षेत्राला सुद्धा लागली आहे. आणि याचा संपूर्ण परिणाम आपल्या आर्थिक आणि सामान्य जीवनावर दिसून येत आहे. पण याच काळामध्ये सर्वात जास्त वेळ आपण घरातील माणसांसोबत खूप चांगल्या पद्धतीने घालवू शकतो. आणि आपल्या मनोरंजासाठी आपलंमराठी कलाकार सुद्धा तेवढाच उत्साही सुद्धा आहे.

आताच्या परिस्थितीमुळे जरी आपण, आपल्या घरामध्ये लोकडाऊन झाले असलो तरी सुद्धा, आपल्याकडे मनोरंजनाचे खूप सारे साधन उपलब्ध आहेत. ज्यामध्ये आपण आवर्जून, मराठी हिंदी वेबसिरीजचा समावेश करू शकतो. सध्या नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ऍमेझॉन प्राईम आणि एम एक्स प्लेअर यांसारख्या सोशल साईटच्या मार्फत नवीन वेबसिरींजचा आनंद घेऊ शकतो. आणि सध्या सगळीकडे फक्त एकाच वेबसिरींजची हवा आहे, आणि ती म्हणजे मनी हाईस्ट, नुकतंच नेटफ्लिक्सवर या वेबसिरींजचा ४ सिजन रिलीज करण्यात आला. आणि पहिल्या ३ सिजनमधल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या सिजनमध्ये मिळाली. या वेब सिरीजमध्ये असणारे कलाकार आणि आणि या वेब सिरीजची गोष्ट हे सार काही आजच्या तरुणाईला आकर्षित करत आहे. मनी हाईस्ट मधील कलाकार जेवढे गाजले तेवढंच या सिरीजमधील Bella Ciao हे गाणं सुद्धा खूप गाजलं, आणि खूप कमी वेळात सगळ्यांच्या पसंतीस सुद्धा पडलं. आणि याच गाण्याचं मराठी व्हर्जन, मराठी चित्रपट, नाटक आणि वेबसिरींजमधील वाघ, म्हणजेच अमेय वाघ याने आपल्या समोर जाहीर केले आहे. नुकतंच अमेयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेल्या चाव, हे मराठी व्हर्जन शेअर केलं आहे.

 

प्रत्येक गोष्टीला एक वेगळा दृष्टीकोण ठेऊन बघणे. आणि त्यामधून आपल्यासोबत प्रेक्षकांचे सुद्धा कसे मनोरंजन करता येईल, याच धडपडीमध्ये असणारा अमेय वाघ नेहमीच काही तरी नवीन घेऊन येत असतो. आणि यावेळी त्याने मनी हाईस्ट मधील, Bella Ciao गाण्याचं  दमदार मराठी व्हर्जन आपल्या समोर सादर केले आहे.