सध्या संपूर्ण देशाला कोरोनासारख्या भयाण संकटाने वेठीस धरले आहे.  आणि या भयाण परिस्थितीमुळे सारेजण आपल्या घरी लॉक डाउन झाले आहेत. आणि या लॉक डाऊन चा फटका सामान्य माणसापासून  राजकीय, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रामधील सगळ्यांना लागला आहे. गेला १ महिना सारेजण आपल्या घरामध्ये, बंदिस्त झाले आहेत. 

पण याच कोरोना वायरस मुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली आणि ती म्हणजे, कामाच्या निमित्ताने संपूर्ण दिवस घराच्या बाहेर असणारा चाकरमनी आपल्या कुटुंबासोबत घरी राहिला आहे. आणि नेहमी हा चाकरमनी काहींना काही शिकण्याचा काहींना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. मग त्यामध्ये चित्र काढणं असो किंवा  आपला आवडीचा छंद जोपासन असो, यासाऱ्या गोष्टीमुळे प्रत्येकाला त्याचा हरवलेला वेळ पुन्हा एकदा मिळाला. आणि या मध्ये आपला मराठी कलाकार सुद्धा मागे नाही आहे. नेहमीच काही तरी नवीन करण्याच्या सवय असणारा हा कलाकार घरी बसून सुद्धा त्याचा वेळ खूप चांगल्या पद्धतीने घालवत आहे. ज्यामध्ये आपण आवर्जून जेवण बनवण्याचा उल्लेख करू शकतो. महेश मांजरेकर, प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, रिंकू राजगुरू, धनश्री काडगांवकर पासून सारे मराठी कलाकार आपल्याला आपल्या घरी जेवण बनवताना दिसत आहे. आणि याची सगळी माहिती कलाकार त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून आपल्याला देत आहे. नुकतंच सई मांजरेकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर महेश मांजरेकरांचा जेवण बनवतानाचा विडिओ शेअर केला आहे. रिंकूने सुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा जेवण बनवण्याचा विडिओ शेअर केला आहे. 
नेहमीच काही तरी नवीन आणि काही तरी वेगळं देण्याच्या धडपडीमध्ये असणारा मराठी कलाकार, आज कोरोना सारख्या भयाण परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचा वेळ खूप चांगल्या पद्धतीने कुटुंबासोबत घालवत आहे. आणि दरदिवशी आपण कोरोना वर कश्या पध्दतीने मात करू शकतो, याबद्दलची जनजागृती करत आहे