सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे सावट पसरले आहे. आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रभर लॉकडाऊनची गंभीर परिस्थिती आली आहे. आणि या कारणामुळे मुंबई सुद्धा ठप्प झाली आहे. आणि याचा परिणाम आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि मनोरंजन या सगळ्या बाबींवर झाला आहे. कधी न थांबणारी मुंबई या कोरोना व्हयरसमुळे थांबली गेली आहे. आणि सगळं चाकरमनी वर्ग आज घरी बसला आहे. 

कोरोना व्हयरसच संकट हे दिवसेंदिवस वाढतच आहे, आणि याच परिणाम सगळी कडे दिसत आहे. पण या कोरोनामुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली आणि ती गोष्ट म्हणजे, कामासाठी संपूर्ण दिवसभर घराबाहेर असणारा चाकरमनी घरी थांबला. कधी न थांबणार हा वर्ग, आज त्याच्या कुटुंबासहित घरी थांबला आहे. पण घरी थांबल्यामुळे याच वर्गाला खूप साऱ्या गोष्टीचा अनुभव घेता येणार आहे. म्हणजेच घरी असलेला हा वेळ तुम्ही तुमच्या साठी वापरू शकता. ज्यामध्ये तुम्ही स्वतः तुमचा आवडीचा छंद जोपासू शकता, कामाच्या ताणामध्ये राहून गेलेला किंवा एकीकडे पडलेल्या हा छंद पुन्हा एकदा सुरु शकता. मग त्यामध्ये वाचन असो, कविता लिहिणं असो, चित्र काढणं असो किंवा जेवण बनवणं हे सारे छंद जोपासत तुम्ही पुन्हा एकदा तुमचा स्वतःचा छंद नव्याने सुरु करू शकता. याखेरीस सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर म्हणजे  हॉटस्टार आणि एम एक्स प्लेअर यासारख्या अँपचा वापर करून तुम्ही घर बसल्या नवीन मराठी चित्रपट आणि वेब सिरींजचा आस्वाद घेऊ शकता. ज्यामध्ये आपण आवर्जून समांतर, पांडू यांसारख्या गाजलेल्या वेब सीरिजचे नाव घेऊ शकतो. याव्यतिरिक्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कामानिमित्ताने खूप वेळ घराबाहेर असणारे आपण, आपला हा वेळ कुटुंबाला देऊ शकतो. आपले आई -  वडील, आपले भावंडं, ज्यांच्या सोबत दिवसातला खूप कमी वेळ आपण घालवत असतो, आणि आता लॉकडाऊन मुळे आपण आपला जास्तीत जास्त वेळ घरातील माणसांना देऊ शकतो. आणि हि सगळ्यात मोठी आणि महत्वाची अशी बाब आहे. 

कोरोनाच वाढत चाललेले सावट, आणि यामुळे आपल्या समोर आलेली हि वेळ, या साऱ्यागोष्ठी लवकरात लवकर दूर होतीलच पण यामध्ये आपण स्वतःसाठी काही वेळ काढू एवढं मात्र नक्की