अग्ग बाई सासूबाईंच्या कालच्या एपिसोड मध्ये आपण पाहिले कि अभिजित राजे, आसवारीचा राग निवळण्यासाठी तिच्या साठी पैंजण घेऊन येतात. आणि ते पैंजण तिच्या पायात बांधण्याचा प्रयत्न करत असतात. आणि सरतेशेवटी अभिजित राजे, आसावरीच्या दुसऱ्या पायामध्ये सुद्धा पैंजण घालतात. आणि अभिजित राजेंच्या या सगळ्या प्रयत्नाला बघून ती त्यांना माफ करते.
दुसऱ्यादिवशी आसावरी, सोहमला खाली जाऊन सामान आणायला सांगते. पण इथे सुद्धा सोहम त्याच्या मोबाईल मध्ये व्यस्त आहे असं सांगत नकार देतो. तिकडे उभे असलेले अभिजित राजे, आसावरी कडून सामानाची लिस्ट घेत ते स्वतः मार्केट मध्ये जातात. घराबाहेर पडल्यानंतर त्यांना त्यांचे शेजारी भेटतात,आणि ते सुद्धा अभिजित राजेंकडे सामानाची लिस्ट देतात. आणि हे सगळं सामान ते घेऊन येतील असं सांगत तिकडून निघून जातात. मार्केट मधून घरी आल्यानंतर अभिजित राजे, आसावरी साठी नवीन साडी घेऊन येतात. पण यासगळ्या गोंधळामध्ये ते, आसवारीने सांगितलेलं सामान आणायचं विसरतात.
अभिजित राजेंवर असलेला राग निवळल्यानंतर,परत एकदा अभिजित राजेंनी घातलेल्या या गोंधळाला घेऊन आसावरी पुन्हा त्यांच्यावर रागावणार तर नाही ना ? हे सार काही पाहण्यासाठी बघत रहा अग्ग बाई सासूबाईंचा पुढील एपिसोड