सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातले आहे, आणि या कोरोनामुळे महाराष्ट्र सरकारने, १४४ कलम  लागू केला आहे. आणि या कायद्याच्या अंतर्गत पहिल्यांदा  मुंबई सोबत सारे शहर ब्लॅकडाउन  झाले  आहेत. आणि या कोरोना व्हायरसचा कहर दुप्पटीने वाढत  आहे. 

कोरोना व्हायरस पासून स्वतःचा बचाव कसा करावा या बद्दलची बातमी महाराष्ट्र सरकार पासून सारेजण  आपल्याला  देत आहे. १४४ च्या कायद्यानंतर मुंबई पासून सगळी कडे ब्लॅकडाउन झाले आहे. आणि हि  बाब जेवढी गंभीर दिसत आहे, तरी सुद्धा आज पर्यंत रस्त्यावर चालणारी माणसांची झुंबड काही कमी होत नाही आहे. आणि या सगळ्यांना एक संदेश म्हणून, आपल्या मराठी  कलाकारांचा एक विडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध होत आहे. या विडिओमध्ये  मराठी कलाकारांनी एकत्र येऊन एक विडिओ शूट केला आहे. आणि प्रत्येक जण कोरोना पासून स्वतःच रक्षण कसे करू शकतो, आणि काय केल्यामुळे आपण कोरोनापासून लांब राहू शकतो याबद्दलची जनजागृती केली आहे. स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, सचिन पिळगावकर, अवधूत गुप्ते, भरत जाधव, प्रसाद ओक, सुबोध भावे, रवी जाधव यांसारख्या अनेक कलाकारांनी सोबत येत हा विडिओ बनवला आहे. आणि सध्या सगळ्या कलाकारांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा विडिओ पोस्ट करत कोरोनापासून घाबरून न जाता, त्याच्या विरुद्ध  कसे लढू  शकतो, याबद्दलच  एक उत्तम उदाहरण वेगळ्याच अंदाजामध्ये आपल्या समोर मांडलं आहे. 
एक कलाकार म्हणून आपण नेहमीच समाजाचे काही देणं लागतो, याच गोष्टीच भान राखत सगळ्या मराठी कलाकारांनी एकत्र येऊन, एकदम वेगळ्या अंदाजामध्ये कोरोना विरुद्ध जनजागृती केली आहे.