सध्या महाराष्ट्रभर कोरोना वायरसने थैमान घातले आहे. प्रत्येकवेळी जनतेला काय करावे आणि काय करू नये ह्याचे सल्ले आपल्याला मिळतच आहेत. खाजगी तसेच काही सरकारी कंपन्यांमध्ये work From Home देण्यात आले आहे. मनोरंजन क्षेत्रही या मध्ये मागे नाही आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी मालिकांचे तसेच चित्रपटांचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे अनेक कलाकार घरी बसून आपला #MeTime एन्जॉय करत आहेत, चला तर आम्ही तुम्हाला दाखवतो आपले लाडके कलाकार नक्की काय करत आहेत. 

भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वांना घरी राहण्याची ताकिद दिली आहे.  त्यामुळे अभिनेत्री सोनाली खरे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून पेंटिंग आणि कुकींगची आवड जोपासत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.


सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुटिंग बंद असल्या कारणाने अभिनेता राज हंचनाळे  वाचन आणि मेडिटेशन (ध्यान, चिंतन) यांमध्ये मन रमवत आहे. त्याचप्रमाणे त्याने घरी योगा व सकस आहार करण्याचा सल्ला फॅन्सना दिला आहे.


अभिनेता शुभांकर तावडे कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी फॅन्सना सार्वजनिक स्थळांवर न जाण्याचा सल्ला देत आहे. शिवाय तो घरात वेबसिरीज तसेच पुस्तकं वाचत असल्याचं व्हिडिओद्वारे सांगत आहे.


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कॅलिफोर्नियातही  सर्वांना घरी राहायला सांगितले आहे. त्यामुळे अचानक मिळालेल्या सुट्टित अभिनेत्री अश्विनी भावे स्वयंपाक, वाचन आणि बागकामात मन रमवताना दिसत आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुटिंग बंद असल्या कारणाने अभिनेता माधव देवचके फावल्या वेळेत घरात नवनवीन पदार्थ बनवायला शिकतोय तसेच कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.