गेल्या तीन वर्षापासून, एक मालिका आज सुद्धा प्रेशकांच्या मनावर राज्य करत आहे. आणि ती मालिका म्हणजे 'झी मराठी' वाहिनी वरील 'तुझ्यात जीव रंगला'. एकीकडे अस्सल लाल माती मधील रांगडा पहिलवान राणा दा आणि दुसरीकडे शिक्षणाला महत्व देणारी पाठक बाई ही जोडी खूप कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. तुझ्यात जीव रंगला या मालिकेने नेहमीच प्रेक्षकांना खेळवून ठेवलं आहे. मग त्यामध्ये राणा दा आणि अंजली बाई या दोघांच प्रेम असुदे किंवा त्या दोघांना दूर करणाऱ्या नंदिता वहिनी हे सारं समीकरण आपण या मालिकेमध्ये बघू शकलो. राणा दाचा बदलेला अंदाज, त्याचा पोलिस पेश्यामधील मधील अवतार, आणि त्याच्या सोबत त्याला नेहमी मिळणारी अंजली बाईंची साथ हे बघायला खुपचं रंजक अस आहे. 

     नुकतंच तुझ्यात जीव रंगला या मालिकेने, १००० भागांचा टप्पा पार केला आहे. मालिकेमधील सगळेच कलाकार उत्तम रित्या प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत आहेतच, पण वेळोवेळी हे कलाकार आपल्या समोर काही तरी नवीन आणि आपल्या लक्षात राहील, अश्या गोष्ठी घेऊन येत आहे. राणा दाचा पहिलवान ते पोलीस पर्यंतचा सगळा प्रवास आपल्याला या मालिकेमध्ये दिसून आला. आणि या सगळ्या प्रवासामध्ये नेहमीच त्याला अंजली बाईंची साथ मिळाली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमधील इतर कलाकार सुद्धा तेवढेच महत्वाचे आणि लक्षात राहण्यासारखे आहेत. ज्यामध्ये आपण आवर्जून नंदिता वहिनी, सुरज, गोदा अक्का, बरकत आणि सगळ्यांचा लाडका लाडू यांचं नाव घेऊ शकतो. या मालिकेला लोकप्रिय करण्यासाठी खलनायिके पासून, बालकलाकारांचं सुद्धा खूप योगदान आहे. आणि हे सारे कलाकार नेहमीच प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन करत आहे. 

       दिग्दर्शक अनिकेत साने आणि लेखक सुबोध कान्होलकर हे नेहमीच त्यांच्या कडून प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या प्रयत्नांमध्ये असतात. आणि त्यांचा हा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने सफल सुद्धा होतो. झी मराठी सारखा आधारस्तंभ आणि अभिनयाने परिपूर्ण अशी अस्सल स्टार कास्ट या सगळ्यांनच्या मेहनतीमुळे आज तुझ्यात जीव रंगला या मालिकेने १००० एवढा मोठा टप्पा पार केला आहे. आणि पुढे सुद्धा हे कलाकार नेहमीच आपलं मनोरंजन करत राहतील यामध्ये काही वाद नाही.