विदर्भ भाषा, त्या भाषेचा एक लहेजा आणि झाडीपट्टी या नाजूक विषयाला हात घालत तृशांत इंगळे या नव्या दमाच्या दिग्दर्शकाचा 'झॉलीवूड' हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. ड्यूएक्सफार्मिंग फिल्म्स यांच्या सौजन्याने, अमित मासूरकर आणि विषबेरी फिल्म्स यांची प्रस्तुती असलेला 'झॉलीवूड' हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला आपल्या भेटीला येणार आहे. 

एक दिग्दर्शक म्हणून हा विषय निवडावासा का वाटला ?
 
याच उत्तर मी दिग्दर्शक म्हणून देण्यापेक्षा, असं सांगीन कि या आधी मी झाडीपट्टी येथे बालकलाकार म्हणून काम केलं आहे. आणि लहानपणापासूनच मला या झाडीपट्टीचं आकर्षण होत. काय असते झाडीपट्टी शहरामधील माणसे झाडीपट्टी बद्दल काय बोलतात. हे मला तिकडे जाऊन अनुभवायचं होत. आणि म्हणून नेहमी मला झाडीपट्टी बद्दल हेवा वाटायचा. २००९ मध्ये मी जेव्हा मुंबईला आलो, आणि जेव्हा पासून माझा चित्रपटश्रुष्टी सोबत संबंध आला तेव्हा ठरवलं कि मी जो कोणता चित्रपट बनविणं तो झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित असेल. कारण झाडीपट्टी रंगभूमी हे एक वेगळंच विश्व आहे. हि एक सांस्कृतिक कला आहे जी गेली १०० वर्षांपासून चालत आली आहे. आणि अजून पर्यंत या कलेबद्दल बाहेरच्या लोकांना माहित नाही आहे. महाराष्ट्राचा भाग असून सुद्धा, आपल्या माणसांना याबद्दल महीयत नाही आहे. आणि त्यांना या झाडीपट्टीच्या संस्कृतीबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून हा विषय मी निवडला.

चित्रपटाचा नाव खूपच इंटरेस्टिंग आहे, काय सांगशील याबद्दल ?

चित्रपटाचं नाव 'झॉलीवूड' ठेवण्यामागचा हा हेतू होता कि, आपण आज पर्यंत बॉलीवूड, हॉलिवूड पाहिलं आहे. अशाच पद्धतीचं झॉलीवूड सुद्धा आहे. कारणं इतर चित्रपटश्रुष्टीप्रमाणे इथे सुद्धा वर्षाच्या चित्रपटांची नोंद होते. तिकडे प्रोडक्शन हाऊस सुद्धा आहेत, तस बघायला गेलं तर ती एक स्वतः मिनी इंडस्ट्री आहे. खरंतर हे नाव मला माझ्या एका पत्रकार मित्राने सुचवलं, म्हणजे त्याने झाडीपट्टीवर एक लेख लिहिला होता, आणि त्यामध्ये या शब्दाचा वापर केलेला. आणि तिकडून मी हे नाव घेतलं आहे. झाडी म्हणजे जंगल आणि पट्टी म्हणजे शेत, जंगलांनी घेरलेला आणि शेतकऱ्यांची शेती म्हणून झाडीपट्टी, जाणीव याच झाडीपट्टीला साजेस असा नाव झॉलीवूड.

चित्रपट हा विदर्भ आणि त्याभाषेवर आधारित असा आहे. काय वेगळं आहे या चित्रपटामध्ये इतर चित्रपटापेक्षा ?

चित्रपटाचं वेगळपण हे त्याच्या भाषेमध्येच आहे. कारण मला तरी असं वाटतंय कि पहिल्यांदा विदर्भाच्या अस्लखलीत भाषेमधील पहिला चित्रपट आहे. जिथे विदर्भ भाषेव्यतिरिक्त दुसरी कोणतीच भाषा वापरली नाही आहे. आणि अजून एक सांगायचं झालं तर, या चित्रपटामध्ये मोठे असे कोणी कलावंत नाही आहेत. जे कोणी आहेत ते सगळे झाडीपट्टी मधील कलाकार आहेत. तिथल्या मातीमध्ये रुजलेले कलावंत झॉलीवूड मध्ये आहेत. हेच वेगळेपण या चित्रपटामध्ये आहे.

चित्रपटामधील कलाकारांबद्दल काय सांगशील ? कसा होता तुझा अनुभव  त्यांच्यासोबत काम करायचा ?

चित्रपटामध्ये मुख्य कलाकार म्हणून आपल्याला अजित खोब्रागडे, अश्विनी लाडेकर आणि  दिनकर गावंडे हे कलाकार दिसणार आहेत.आणि सांगायचं झालं तर यासगळ्यांसाठी हा पहिला चित्रपट होता, आणि एक अडीच - तीन तासाचा सिनेमा काय असतो आणि कसा असतो हे त्यांना माहित न्हवत. याच कलाकारांसोबत काम करत त्यांचे , मी वर्कशॉप घेतले. आणि त्यामधूनच हे सारे कलाकार मला मिळाले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कलाकारांमध्ये, झाड़ीपट्टीच्या मातीचा वास आहे. आणि मला त्यांच्याकडून जे पाहिजे तेच, किंबहुना त्यापेक्षा खूप जास्त मला दिलं आहे. आणि खरंच सगळ्या कलाकारांनी खूप चांगलं काम केलं आहे.

एक दिग्दर्शक आणि एक सामान्य माणूस काय सांगशील चित्रपटाचं गांभीर्य केवढं आहे. ?

दिग्दर्शक म्हणून हेच सांगू शकतो कि, मला हा विषय सगळ्या लोकांपर्यंत पोहचवायचा आहे. झाडीपट्टीची लोककला आणि तिचं वेगळपण हे सारं काही प्रेक्षकांना दाखवायचं आहे. आणि या विषयाचं गांभीर्य हे, चित्रपट बघूनच कळेल. आणि एक सामान्य माणूस म्हणून हे सांगू शकतो कि, या चित्रपटामधून खूप काही नवीन बघायला आणि शिकायला मिळणार आहे. आणि जर हे सगळं आपल्याला अनुभवायचं असेल तर, हा चित्रपट बघावा लागेल एवढं मात्र नक्की !

यानंतरचे तुझे येणारे नवीन प्रोजेक्ट कोणते आहेत ?

सध्या तर मी, 'झॉलीवूड' वरच लक्ष देतोय. माझ्यापरीने जेवढं या विषयाला प्रेक्षकांपर्यंत पोहचवता येईल तेवढं मी करणार आहे. आणि हा माझा पहिलाच चित्रपट आहे, म्हणून माझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर सुद्धा आहे. आणि एक फिल्ममेकर म्हणून झॉलीवूड हि खूप मोठी जवाबदारी आहे माझ्यावर म्हणून सध्या तरी फक्त झॉलीवूड... बाकी काही नाही.