सध्याच्या डिजिटल वर्ल्डमध्ये व्हाट्सअँप नंतर जर कोणत्या एप्लिकेशने तरुणाईपासून सगळ्यांची मने जिंकली असतील तर ते म्हणजे टिक - टॉक, गेल्या वर्षांपासून सुरु झालेल्या या एप्लिकेशने खूप कमी वेळातच आपली एक वेगळी जागा बनवली आहे. व्हाट्सअँप नंतर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपण हे एप्लिकेशन बघू शकतो. हिंदी, मराठी, इंग्रजी गाणी, चित्रपट आणि मालिकांमधील डायलॉगचे लिपसिंग करत या एप्लिकेशन द्वारे आपण आपला विडिओ बनवून आपले फॉलोवर्स वाढवू शकतो. आणि आत्ताची तरुणाई या साऱ्याच गोष्टीमध्ये अव्वल आहे. फक्त तरुणाई नाही तर सगळ्याच वयोगटातील व्यक्ती आपला विडिओ या एप्लिकेशन द्वारे बनवत या डिजिटल वर्ल्डमध्ये लाखों फॉलोवर्स टप्पा पार केला आहे.     टिक - टॉक या एप्लिकेशनच्या प्रेमात फक्त सामान्य माणूस नाही तर, हिंदी - मराठी चित्रपट श्रुष्टीमधील कलाकार सुद्धा आहेत. नेहमी काही तरी नवीन आणि वेगळं देण्याचा प्रयत्न करणारे हे कलाकार टिक - टॉक मधून सुद्धा आपलं मनोरंज करत आहे. ज्यामध्ये आपले  मराठीमधील कलाकार सुद्धा मागे नाही आहेत. टिक - टॉक हे एप्लिकेशन मनोरंजनासाठी जरी वापरले जात असेल, तरी याचा खूप वेळा दुरुपयोग सुद्धा होतो. आणि याच एप्लिकेशनमुळे कित्येक तरुणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. या गोष्टीची खबरदारी घ्यावी म्हणून, हिंदी चित्रपटश्रुष्टी मध्ये आपल्या मराठीचा डंका वाजवणारा अभिनेता, रितेश देशमुखने एक टिक टॉक विडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेशने  सगळ्या तरुणाईला हे एप्लिकेशन कशा पद्धतीने वापरावे आणि हे वापरताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली आहे. एक कलाकार फक्त मनोरंजनाचं काम नाही करत, तर तो कलाकार समाजाचं सुद्धा देणं लागतो. आणि याच गोष्टीच भान राखत रितेश देशमुखने हा विडिओ त्याच्या टिक टॉक अकाउंट वर शेअर केला आहे. 

      टिक टॉक या एप्लिकेशनचा वापर फक्त आणि फक्त मनोरंजनासाठीच झाला पाहजे, आणि याचा कितपत वापर करावा आणि करू नये. या साऱ्या गोष्टींचे भान राखणे खूपच गरजेचे आहे. कारण मनोरंजनापेक्षा जीव खूप मोलाचा आहे हाच संदेश रितेश देशमुखने आपल्या विडिओ द्वारे त्याच्या फॅन्सला दिला आहे. आणि याच मनोरंजन एप्लिकेशनचा वापर कितपत करावा याची सुद्धा जाणं आपल्याला असणे गरजेचे आहे.