महात्मा गांधी आणि त्यांच्यावर गोळी झाडणारे नथुराम गोडसे, हि गोष्ट आजदेखत सगळ्यांना माहित आहे. आणि अश्या या गंभीर विषयावर रंगभूमीचे कसलेले कलाकार शरद पोंक्षे यांनी ' मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक रंगभूमी वर आणले. गांधी हत्या करताना, नथुराम आणि त्यांचे भाऊ गोपाळ यांच्या  मनात काय होत असेल ? त्यांचे काय विचार असतील या साऱ्यावर आधारित गोपाळ गोडसे यांनी ' गांधी हत्या आणि मी' हे पुस्तक लिहिले. आणि सध्या याच विषयावर आधारित अजून एक नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

   संदेश सुरेश भट यांच्या सुयोग नाट्यसंस्था निर्मित ८९ व्य नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकफोडे हे करत आहेत. आणि याच नाटकामुळे नथुराम हे नाव पुन्हा एकदा रंगभूमी वर आले आहे. नथुराम यांनी गांधीची हत्या केली, आणि या हत्येमागचं कारण सुद्धा नथुराम यांनी खटल्यादरम्यान प्रस्तुत केले. आणि याची शिक्षा म्हणून नथुराम यांना फाशी मिळाली. पण नथुराम नावाचं हे वादळ इथेपर्यंतरच मर्यादित असं न्हवत, कारण त्यानंतर त्यांच्या परिवाराचं काय झालं ? यासगळ्यामुळे नथुराम परिवार कसे भरडले गेले असतील याच विचार कोणीच नाही केला. आणि याच सारांशावर आधारित ' गांधी हत्या आणि मी' हे नाटक उभे राहिले आहे. सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांनंतर सौरभ गोखले यांनी या नाटकामध्ये नथुराम गोडसेंची भूमिका साकारली आहे. नथुराम गोडसे यांचे बंधू गोपाळ त्यांची पत्नी सिंधू या सिंधूचा संघर्ष , सावरकरांचा विचार, नथुरामांचा जिवलग मित्र नारायण आपटे या साऱ्या कलाकृती आपण या नाटक मध्ये बघू शकतो. 


     महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे हे इतिहासातील, खूप गाजलेले आणि तेवढेच महत्वाचे असे नाव  आहे. महेश डोकफोडे यांचं लेखन आणि दिग्दर्शन असलेले ' गांधी हत्या आणि मी' हे नाटक रंगभूमीवर खूप चांगल्या पद्धतीने गाजत आहे. सौरभ गोखले, रुपाली भोसले, अंबरीश देशपांडे, अक्षय मुडावदकर आणि महेश डोकफोडे या सगळ्याच कलाकारांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जाग बनवत आहे. आणि यासगळ्या कलाकारांच्या मेहनतेची दाद म्हणून राज्य शाशनाचे एकूण २८ पुरस्कार या नाटकाला मिळाले आहे. आणि पुढे सुद्धा या नाटकाची अशीच यशस्वी वाटचाल राहील एवढे मात्र नक्की.