अनेक वाद - विवाद, भांडण तंटा, एकमेकांसाठी असणारा राग या सगळ्यागोष्टींमुळे सिद्धी आणि शिव नेहमीच एकमेकांपासून दूर राहिले. पण त्यांचा हाच मुसद्दीपणा त्यादोघांना कधी जवळ घेऊन आला हे त्यांना सुद्धा समजलं नाही. लग्नाच्या दिवसापासून दोघांमध्ये चालणारी भांडणे, त्या दोघांमध्ये सुरु असणारे गैरसमज या सगळ्या गोष्टी नेहमीच सिद्धी आणि शिवाच्या नात्यामध्ये अंतर घेऊन आले. पण अनेकदा सिद्धी आणि शिवा या दोघांनी एकत्र येऊन त्यांच्या समोर येणाऱ्या, सगळ्या संकटांवर तोडगा काढला आहे. मग त्यामध्ये सिद्धीच्या परीक्षेचा प्रश्न असो किंवा, शिवा वर झालेला प्राणघातक हल्ला या सगळ्यामधून सिद्धी आणि शिवाने मार्ग काढला आहे. 

     सरतेशेवटी, एवढ्या सगळ्या अडचणीनंतर सिद्धी आणि शिवा एकत्र आले आहेत. मग त्यामध्ये सोनीची मध्यस्ती असो किंवा यशवंतरावांचा पाठिंबा, या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे दोघे विरोधी टोकाचे प्रेमीयुगुल खऱ्या अर्थाने सोबत आले. सुरमारीच्या घटनेनंतर, सिद्धीचा शिवाबद्दल असलेले गैरसमज दूर झाले. आणि सिद्धी, शिवाच्या जवळ येऊ लागली. सोनीच्या शिकवणीचा प्रश्न आणि यामधून शिवाने काढलेला मार्ग या साऱ्या गोष्टीमुळे सिद्धीच्या मनात, शिवाबद्दल असलेला राग कमी होत गेला. सिद्धी आजारी असताना, शिवाने केलेली तिची सेवा, सिद्धीसाठी केले जेवण आणि तिची घेतलेली देखभाल या लहान - लहान पण प्रेमाने भरलेल्या गोष्टी त्यादोघांना जवळ घेऊन येत आहे. आणि याचसगळ्या गोष्टींची जाणीव सिद्धीला झाल्यानंतर, ती शिवासमोर तिच्या प्रेमाची कबुली देणार आहे. 


   दोघांचं बहरत चालणार प्रेम या सगळ्यागोष्टी त्यादोघांना एकमेकांच्या अधिक जवळ घेऊन येत आहे. आणि याच नात्यामधील काही गोड क्षण आपल्याला येत्या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. सिद्धी - शिवाच्या नात्याची सुरु झालेली नवीन चाहूल, आणि त्यादोघांमधील वाढणारे अंतर हे सार पाहण्यासाठी बघ रहा जीव झाला येडा पिसा फक्त कलर्स मराठी वर..