भारतातच नव्हे तर जगभरात ज्याच्या नावाचा बोलबाला आहे... ज्याच्या ज्ञानाने अबालवृद्धांना समृद्ध केलंय...ज्याची थोरवी गाण्यासाठी अनेक गीतं लिहिली गेली असा महामानव... अर्थात भारतीय संविधानाचे शिल्पकार 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांचा जीवनपट आपण स्टार प्रवाह वाहिनीवर बघू शकतो. बाबासाहेबांचं आयुष्य आणि सर्वसामान्य दलितांसाठी त्यांनी केलेला संग्राह हे सार काही आपण या कार्यक्रमामध्ये बघू शकतो. 

     बाबासाहेबांनी केलेली शिक्षणासाठीची तडजोड, त्यांचा विवाह सोहळा, ते  त्यांच्या आयुष्यामधील सगळ्यात पहिला 'चवदार तळ्याचा सत्याग्रह' हे सार काही प्रेक्षकांसाठी खूपच रंजक असे होते. बाबासाहेब नेहमीच दलित समाजासाठी पुढाकार घेत त्यांच्या हक्कासाठी लढले आहेत. आणि यावेळी त्यांच्या मार्गात जे काही कष्ट आणि ज्या काही तडजोडी आल्या, त्या सगळ्या त्यांनी हसत हसत पार केल्या. आणि आता बाबासाहेब आंबेडकर आपल्यासमोर गोलमेज परिषदेची काही ठळक मुद्दे घेऊन येणार आहे. आणि याच परिषदेदरम्यान, एक ऐतिहासिक भेट आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी, गोलमेज परिषदेची मुद्दे आणि अस्पृश्य समाजाला मिळणारी वागणूक या संदर्भात हि भेट होणार आहे. आणि आता हि ऐतिहासिक भेट आपल्या समोर कोणते मुद्दे घेऊन येईल हे पाहण्यात खरी रंजकता आहे.  
     स्टार प्रवाह वाहिनीवरील, डॉ बाबासाहेब आंबेडकर या मालिकेने खूप कमी वेळातच आपला एक वेगळा प्रेक्षक वर्ग बनवला आहे. इतिहास आणि त्याच्याशी जोडलेले अनेक किस्से हे सगळं काही आपण या मालिकेमधून बघू शकतो. अभिनेता सागर देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याचसोबत या मालिकेमध्ये शिवानी रांगोळे या अभिनेत्रीने रमाबाईची भूमिका साकारली आहे.