मी मिरवणार सगळ्यांची जिरवणार... असं म्हणत खूप कमी वेळात सुमीने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवलं. झी मराठी वरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेने सगळ्या प्रेक्षकांना वेड केलं आहे. मराठी मालिकांमध्ये नेहमीच आपल्याला टिआरपीची शर्यत बघायला मिळते. अश्या या स्पर्धेमध्ये आपलं स्थान पक्क करणं, हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं असं आहे. आणि झी मराठीवर टिआरपीचा  उचांक गाठणाऱ्या मालिकेने म्हणजेच, मिसेस मुख्यमंत्रीने २०० भाग पूर्ण केले आहेत. 

      मिसेस मुख्यमंत्री मालिकेची स्टोरी जेवढी भन्नाट आहे, त्यापेक्षा जास्त भन्नाट त्यांची स्टारकास्ट आहे. अमृता धोंगडे, तेजस बर्वे, अनुराधा पाटील, रोहन चव्हाण यांसारख्या कलाकारांमुळे, मिसेस मुख्यमंत्री या मालिकेने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहणारा समर आणि त्याच्या आयुष्यामध्ये आलेली गावातली सुमी, आणि मग सुरु होणारा गोंधळ हे सार खूप चांगल्या पद्धतीने या मालिकेमध्ये रंगवले आहे. मग त्यामध्ये सुमी आणि समरच प्रेम असो किंवा, त्या दोघांना एकमेकांपासून लांब करण्याचा राजश्रीचा प्रयत्न हे सार काही या मालिकेला इतर मालिकांपेक्षा वेगळं बनवते. नुकतेच या मालिकेने २०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला आहे. आणि याच अवचित्य साधून, सगळ्या कलाकारांनी इंस्टाग्राम अकाउंट वर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. प्रेक्षकांचं प्रेम, त्यांचा पाठिंबा आणि त्यांचा असणारा विश्वास यासगळ्या गोष्टींमुळे मिसेस मुख्यमंत्रीने २०० भाग पूर्ण केले आहे.      श्वेता शिंदेची निर्मिती असलेली , हि मालिका नेहमीच काही तरी नवीन आणि प्रेक्षकांना आपल्या जागे वर बसवून ठेवेल असे टप्पे घेऊन येते. आणि सध्या हि मालिका सुद्धा अश्याच एका वळणावर आली आहे. यापुढे सुद्धा 'मिसेस मुख्यमंत्री' हि मालिका आपलं मनोरंजन करत २०० पेक्षा अधिक  भागांचा टप्पा पार करेल यात काही शंका नाही.