चित्रपट असो कि, कोणती मालिका जो पर्यंत त्यांची प्रसिद्धी होत नाही. जो पर्यंत त्या गोष्टीची चर्चा प्रेक्षकांमध्ये होत नाही. आणि हि प्रसिद्धी कोणत्याही प्रकारची असू शकते, एक तर चांगली सुद्धा नाही तर वाईटसुद्धा, आणि एकदा का या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या कि त्या तेवढ्याच प्रमाणात गाजतात सुद्धा ! 

        सध्या अशीच काहीशी हव्वा, पूजा सावंत आणि भूषण प्रधान या दोघांच्या फोटोने केली आहे. सध्या व्हेलेंटाईन वीक चालू आहे. याच दरम्यान पूजा सावंत आणि भूषण प्रधान या दोघांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कपल शूटचे फोटो शेअर केले आहेत. आणि हा संपूर्ण आठवडा, प्रेमाचा आठवडा म्हणून साजरा केला आहे. प्रत्येक दिवसासाठी एक नवीन फोटो आणि त्या फोटोला साजेस असं कॅप्शन, या सगळ्या गोष्टींमुळे पूजा आणि भूषण सगळ्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. आणि खूप कमी वेळातच प्रेक्षकांनी या फोटोला लाईक्स करत, खूप साऱ्या कंमेंट्स सुद्धा केल्या आहेत. फक्त प्रेक्षकांनीच नाही तर मराठी कलाकारांनी सुद्धा त्यांच्या या फोटोवर कंमेंट्स केल्या आहेत. पूजा सावंत आणि भूषण प्रधान या दोघांमध्ये काय चालू आहे ? याची उत्सुकता प्रेक्षकांसारखी, कलाकारांना सुद्धा होती. सरतेशेवटी पूजा आणि भूषणने या सगळ्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. हा सगळा फोटोशूट त्यादोघांच्या नवीन सॉंग अल्बमचा आहे. नुकतंच पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर 'चंद्र झुल्यावर' या नवीन गाण्याची एक झलक शेअर केली आहे. पूजा आणि भूषण यादोघानीं या सॉंग अल्बममध्ये काम केले आहे. आणि या गाण्याच्या प्रसिद्धीसाठीच पूजा आणि भूषणने कपल फोटोशूट केले होते.        सध्या सोशल मीडियावर पूजा सावंत आणि भूषण प्रधानचे 'चंद्र झुल्यावर' हे गाणे खूप चांगल्या पद्धतीने व्हायरल होत आहे. आणि या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. पण यासगळ्या मध्ये गाण्याच्या प्रसिद्धी साठी पूजा आणि भूषणने केलेल्या प्रसिद्धीचा पद्धत खूपच भन्नाट अशी होती यामध्ये काहीच वाद नाही.