जगभरामध्ये अनेक चित्रपट महोत्सव साजरे केले जातात. त्याचपैकीं 'बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' हा एक मोठा आणि मानाचा चित्रपट महोत्सव मानला जातो. आणि नेहमीच या महोत्सवामध्ये मराठीचा डंका वाजला आहे. यावेळी सुद्धा बर्लिनमध्ये मराठीचा जयघोष झाला आहे. दिग्दर्शक अक्षय इंडीकर याच्या ‘स्थलपुराण’ या आगामी चित्रपटाची निवड झाली आहे.  २० फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान हा चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. याआधी बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये, ‘सामना’, ‘विहीर’, ‘किल्ला’ आणि ‘सैराट' हे चित्रपट झळकले होते. 

     बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये, आपल्या चित्रपटाची निवड व्हावी म्हणून अनेक होतकरू दिग्दर्शक धडपड करत असतात. त्याच दिग्दर्शकांपैकी अक्षय इंडीकर याने आपल्या मराठीचा शेला उंचावला आहे. त्रिज्या’ आणि ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या दोन सिनेमांना लाभलेल्या उत्तुंग यशानंतर, अक्षय इंडीकर यांच्या ‘स्थलपुराण’ या आगामी सिनेमाची निवड ‘बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट’ महोत्सवासाठी करण्यात आली आहे. जर्मनी या देशाची राजधानी असेलेल्या बर्लिन या शहरात २० फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत हा महोत्सव संपन्न होणार आहे. जगभरात साजरा होणाऱ्या विविध चित्रपट महोत्सवांपैकी बर्लिन चित्रपट महोत्सवाला अतिशय मानाचे स्थान आहे. यापूर्वी ‘एशियन न्यु टॅलेंट अवॉर्ड’ आणि ‘टॅलिन ब्लॅक नाईट फिल्म फेस्टिवल’ या तितक्याच महत्त्वाच्या सिनेमा महोत्सवांमध्ये सुद्धा स्थलपुराण चित्रपटाची निवड झाली आहे. 

अक्षय इंडीकर दिग्दर्शित, संजय शेट्ये निर्मित आणि विन्सन प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये एका लहान मुलाची मनोभूमीका दाखवण्यात आली आहे. आठ वर्ष वय असलेल्या मुलाचे शहरातून आपल्या आई आणि बहिणीसोबत अचानक कोकणातल्या एका लहान गावात झालेले स्थलांतर , गर्द पाऊस आणि रोरावणाऱ्या समुद्राची उत्कट आणि उदास पार्श्वभूमी, आणि भवतालच्या साऱ्या गलबलाटात अचानक अदृश्य झालेल्या आपल्या वडीलांचा शोध या पार्शवभूमी वर हा चित्रपट आधारित आहे. 

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सारख्या अनेक, महोत्सवांमध्ये आपल्या मराठीचा डंका वाजला आहे. आणि नेहमीच अश्या हरहुन्नरी दिग्दर्शक आपल्या मराठी भाषेचे नाव मोठं करत आहे.अक्षय इंडीकर सुद्धा त्याच दिग्दर्शकांपैकी एक आहे. आणि लवकरच स्थलपुराण या चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.