कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा, या कार्यक्रमाने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली. नवीन अध्यायापासून सुरु झालेल्या या पर्वाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कौतुक झालं. नवीन पर्वातील सगळ्याचं स्पर्धकांनी त्यांच्या गाण्यातून गेली ५ महिने संपूर्ण महाराष्टाच्या मनोरंजन केलं. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सची तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींची शाबासकी सुद्धा मिळवली. २२ शिलेदारांपासून सुरु झालेल्या या पर्वामधून टॉप ६ स्पर्धक, अंतिम फेरी मध्ये दाखल झाले. 

      रविंद्र खोमणे, स्वराली जोशी, अक्षया अय्यर, अमोल घोडके, राजू नदाफ, श्रावणी वागळे या स्पर्धकांनी, आपल्या गाण्याने आणि मेहनतीने सगळ्या स्पर्धकांना मागे टाकून फायनल मध्ये आपले स्थान पक्के केले.या अंतिम सहा शिलेदारांपैकी अक्षया अय्यरने बाजी मारली आहे. अक्षया अय्यरने सूर नवा ध्यास नवाची राजगायिका होण्याचा मान पटकावला. अक्षया अय्यरला कलर्स मराठीतर्फे २ लाख रुपये, आणि वामन हरी पेठे सन्स यांनी डिझाईन केलेली मानाची सुवर्णकटयार मिळाली. सूर नवा ध्यास नवाच हे पर्व सुद्धा तेवढच रंजक असं ठरलं. कारण या पर्वामध्ये सगळ्या वयोगटातील स्पर्धकांनी आपली हजेरी दर्शवली. मग त्या मध्ये ५ वर्षांपासून ते ५५ वर्षापर्यंत सगळे स्पर्धक भाग घेऊ शकत होते. आणि यावेळी पार पडलेल्या अंतिम सोहळ्याचे मूळ आकर्षण बनले पद्मश्री हरिहरनजीं. महाअंतिम सोहळ्यामध्ये अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांनी त्यांच्या दमदार गाण्यांनी स्पर्धक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आणि त्याच जोडीला आपल्या मधुर आवाजाने पद्मश्री हरिहरनजीं यांनी सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली.  

सूर नवा ध्यास नवा, हा कार्यक्रम नेहमीच आपल्या समोर नवीन चेहेरे घेऊन येत असतो. आणि हेच चेहेरे नंतर पुढे जाऊन आपल्या आवाजाच्या जादूने संपूर्ण महाराष्ट्राला वेडं लावतात. सूर नवा ध्यास नवा च्या या पर्वाची राजगायिकेचा मान पटकावलेली स्पर्धक, अक्षया अय्यर पुढे जाऊन सुद्धा आपले असेच मनोरंजन करेल यामध्ये काही वाद नाही.