चित्रपटश्रुष्टीमधील सगळ्यात महत्वाचा आणि सर्वोच्च पदाचा असा मानला जाणारा पुरस्कार सोहळा  म्हणजे ऑस्कर, आपले संपूर्ण आयुष्य सिनेमासाठी बहाल करणाऱ्या चित्रपट वेड्यांसाठी  हा अवॉर्ड सोहळा खूपच जवळचा आणि स्वप्नपूर्ती असा असतो. आणि नुकताच हा अवॉर्ड सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. हॉलिवूड विश्वातील या अवॉर्ड सोहळ्याने साऱ्यांचे मन जिंकून घेतली. अँड ऑस्कर गोज.. टू , या चार शब्दांसाठी सारे चित्रपटकर्मी आपल्या आयुष्याची अनेक वर्ष सिनेमाला देतात. चित्रपटाचा विषय, चित्रपटाची भाषा आणि त्यामध्ये काम करणारे सारजण या सगळ्यांसाठी ऑस्कर हा परिसाच काम करतो.

     १९२९ पासून सुरू झालेल्या या ऑस्कर पुरस्काराला अकॅडमी पुरस्कार सुद्धा म्हटलं जात. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या अकॅडमी मार्फत हे अवॉर्ड्स दिले जातात. यंदाच्या ९२ व्या ऑस्कर पुरस्कार मध्ये, दक्षिण कोरियाने बाजी मारली आहे. यंदाच्या ऑस्करवर ‘पॅरासाइट’ या चित्रपटाने छाप पाडली. ऑस्करच्या अंतीम फेरीपर्यंत पोहोचणारा हा पहिलाच दक्षिण कोरियन चित्रपट आहे. त्याव्यतिरिक्त २०१९ च्या समाप्तीला प्रदर्शित झालेला जोकर या चित्रपटाचा नायक जोकिन फिनिक्सने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. यंदाच्या ऑस्करमध्ये जोकर या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, कारण या चित्रपटाने सर्वाधिक ११ नामांकनं मिळवली होती. त्याच सोबत ऑस्कर २०२० मध्ये, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ब्रॅड पिट ( वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड ), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - लॉरा डर्न ( मॅरेज स्टोरी ), बेस्ट अ‍ॅनिमेटेड फिचर फिल्म - टॉय स्टोरी ४, डॉक्युमेंट्री फिचर - अमेरिकन फॅक्टरी यांसारख्या चित्रपटांनी आणि कलाकारांनी बाजी मारली. पण यावेळी सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलेला आणि मार्वल स्टुडिओचा ( अव्हेंजर्स - एन्ड गेम ) या चित्रपटाला माघार घ्यावी लागली. 

      १९२९ पासून सुरु झालेला हा अवॉर्ड सोहळा आज सुद्धा सगळ्यांसाठी खूप खास आहे. आपला संपूर्ण आयुष्य चित्रपटासाठी देणारे कलंदर, या अवॉर्ड सोहळ्याची एखाद्या चातका सारखी वाट बघत असतात. कारण एका चित्रपटासाठी केली मेहनत, त्याच्या साठी घेतलेलं कष्ट या साऱ्या गोष्टींचं चीझ या अवॉर्ड सोहळ्यामध्ये मिळते.