२० वर्षांपूर्वी ‘यदा कदाचित' हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याचे साडेचारशे प्रयोग होऊन त्या नाटकाने अक्षरशः धुमाकूळ घातला. आणि त्याच नाटकाला रिबूर्ट करत, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता संतोष पवार  'यदा कदाचित रिटर्न' हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर घेऊन आला. आणि सध्या या नाटकाने १०० प्रयोगांचा टप्पा पार केलं आहे.

    संतोष पवार हे ‘लोककलां’ मध्ये रमणार असं पात्र आहे. सध्याच्या परिस्थितीला घेऊन त्याच्यावर हास्यात्मकरित्या  भाष्य करत प्रेक्षकांना हसवत ठेवत एक सामाजिक संदेश देऊन जाते. संतोष पवार याने हे नाटक सगळ्यात आधी एकांकिका स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसमोर आणले. तिला स्पर्धेत सर्वोत्तम यश लाभलं नसलं तरी प्रेक्षकांना मात्र ही मॅड कॉमेडी खूप आवडली  होती. यदा कदाचीत हे नाटक खूप वर्षपूर्वी रंगमंचावर आले होते. आणि त्यामध्ये असलेल्या महाभारत आणि रामायणामधील पात्रांना घेऊन खूपच वाद झाले. म्हणून यावेळी मात्र संतोषने हि सगळी पात्र गाळून, ‘बाहुबली’मधील बाहुबली , भल्लालदेव , कटप्पा , देवसेना , बाबाश्री , आयश्री तसेच शिवकालीन शाहिस्तेखान , वेताळ , बिरबल , पाकिस्तानी क्रिकेटपटू , आताची शांताबाई  या पात्रांचा समावेश केला. आणि  'यदा कदाचित रिटर्न' या नावाने प्रेक्षकांसमोर आले. चित्रपटाचा मूळ गाभा न सोडता, संतोष पवारने या नाटकाला आपल्या लेखनाने आणि दिग्दर्शनाने योग्य ते न्याय दिला. त्याच प्रमाणे संतोषने स्वतः या नाटकांमधील गीते लिहिली आहेत. नाटकाचा मूळ गाभा हा गवळण, नमन यांच्या पट्टीमधला असला तरी,  विच्छा माझी पुरी करा , वस्त्रहरण या लोकनाट्यांपेक्षा काहीतरी वेगळं संतोष पवारने आपल्यासमोर सादर केले आहे.  

      अनेक वर्षे रंगमंच आणि रंगदेवतेचे पूजन करत संतोष पवार नेहमीच आपल्यासाठी काही तरी नवीन घेऊन येण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. आणि नेहमीप्रमाणे रसिकमायबाप त्याच्या या प्रयत्नाला अक्षरशः डोक्यावर घेतात. 'यदा कदाचित रिटर्न' हि सुद्धा त्यामधील एक कलाकृती आहे. आणि त्याच्या या कलाकृतीने १०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. रंगमंचावर हास्याची लाट उडवणारे हे नाटकं सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे घर करत आहे. आणि म्हणूच 'यदा कदाचित रिटर्न' हे नाटकं २०० प्रयोगांचा टप्पा पार करत, नाटकाची घोडदौड अशीच सुरु राहील यात काही वाद नाही.