मैत्री, राग, भांडण, आणि मानाचा खिताब मिळवण्यासाठी सुरु असलेली शर्यत यासाऱ्याचा खेळ म्हणजे, मराठी बिग बॉस. कलर्स मराठीची प्रस्तुती असलेल्या मराठी बिग बॉसच नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या  भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवर सुरु झालेल्या बिग बॉस सीजन १ आणि सीजन २ या दोन्हीं  सिजन्सने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. हिंदीमध्ये सुरु झालेला हा गेम शो, प्रथमच मराठी मधून आपल्यासमोर आला. चित्रपट आणि मालिकांमध्ये गाजलेले कलाकार आपल्याला या सीजनमधून बघायला मिळाले. 

    आणि आता लवकरचं मराठी बिग बॉसच नवीन पर्व आपल्या भेटीला येणार आहे.  कलर्स मराठीची प्रस्तुती असलेला  मराठी बिग बॉसचे पहिले दोन सीजन खूप चांगल्या पद्धतीने गाजले. आणि या दोन्हीं सिजनला गाजवण्याच महत्वपूर्ण काम केलं, ते म्हणजे या सिजनमधील स्पर्धकांनी.  'बिग बॉस या गेम शोला त्याच्या स्पर्धकांमुळेच खरी रंगत आली. वेगवेगळ्या मालिका - चित्रपटांमधील, भिन्न विचारांचे आणि वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असे स्पर्धक जेव्हा एकत्र तब्बल ३ महिन्यांसाठी एकाच घरी राहतात, आणि स्वतःला जिंकण्यासाठी सुरु असणारी चुरस हे सार काही बघायला खूपच रंजक असं दिसत.  बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिजनच्या ट्रॉफीवर मेघा धाडेने आपल्या नावाची नोंद केली. तर दुसऱ्या सीजनचा विजेता शिव ठाकरे याने  सगळ्यांची मनें सुद्धा जिंकली. बिग बॉस मराठीचा पहिला सीजन हा मेघा धाडे, रेशम टिपणीस, राजेश शृंगारपुरे या कलाकारांमुळे तर दुसरा सीजन हा अभिनेत्री शिवानी सुर्वे, नेहा शितोळे आणि पॉलिटिशन अभिजित बिचुकले यांमुळे गाजला.

     लवकरचं बिग बॉस मराठीच तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सध्या तरी या सिजनची थीम आणि या सिजनमध्ये कोणते स्पर्धक असतील हे सार काही गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आले आहेत. पण एवढं मात्र नक्की कि, हे सिजनसुध्दा आधीच्या २ सिजनसारखंच गाजेल यात काही वाद  नाही.