सध्या रंगभूमीवर गाजणारे, 'संगीत देवबाभळी' या नाटकाने ३०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या या नाटकाने त्यांचा ३०० वा प्रयोग, ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये पार पाडला. दिग्दर्शक प्राजक्त देशमुख आणि प्रसाद कांबळी यांची प्रस्तुती असलेल्या या नाटकाने खूप कमी वेळातच सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली. आणि अजून सुद्धा या नाटकाची घोडदौड अशीच सुरु आहे. 

     मराठी रंगभूमी नेहमीच, मेहनत आणि कलेची कदर करत आली आहे. अभिनेत्री मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते यांची मुख्य भूमिका असलेलं हे नाटक खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं.  मच्छिंद्र  कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनची ५५ वी कलाकृती असलेले हे नाटक, विठ्ठल आणि तुकोबा यांच्या नात्यावर आधारित असले तरी, यामध्ये विठ्ठल आणि तुकोबा हे कुठेच दिसत नाही. याउलट देव आणि भक्ती यावर हे सार नाटक अवलंबलेलं आहे. गर्भवती असताना, तुकोबांना शोधात असणारी आवली, आणि नंतर पुढे तिच्या सोबत घडणारे सारे प्रसंग आणि तिच्या सोबत मदतीला असणारी रखुमाई हा या नाटकाचा मूळ गाभारा आहे. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेल्या तुकोबाचा शोध घेत, हा विठ्ठल कोण आहे ? याच उत्तर शोधण्यासाठी आवलीची चालणारी सारी धडपड खुप चांगल्या पद्धतीने या नाटकांमध्ये रंगवली आहे. संगीत देवबाभळी हे नाटक सर्वात आधी रंगमंचावर एकांकिका म्हणून आले, आणि त्यानंतर या एकांकिकेचं रूपांतर नाटक करण्यात आले. भद्रकाली प्रोडक्शन आणि प्रसाद कांबळी यांची प्रसूती असलेले हे नाटक, संगीत नाटक आहे. यामधील सगळी गाणी हि तुकोबाचे अभंग असले तरीही, ती निव्वळ भक्तीसंगीत जाणवत नाही. आणि म्हणूनच हे नाटक आज सुद्धा तेवढ्याच जोमाने पुढे जात आहे.

     प्राजक्त देशमुख दिग्दर्शित 'संगीत देवबाभळी' या नाटकामध्ये प्रमुख भूमिका म्हणून काम करत असणाऱ्या अभिनेत्री मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते  यांनी सुद्धा आपल्या आपल्या अभिनयाची छाप सगळ्यावर पाडली आहे. आणि या नाटकाला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यांसारखी ३९ पुरस्कार प्राप्त झाली आहेत.