बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये सध्या सवाल ऐरणीचा हा टास्क रंगतो आहे. ज्यामध्ये घराबाहेर जाण्यसाठी प्रत्येक टीममधून एक एक सदस्याचे नावं बिग बॉस घेत आहेत. ज्या सदस्याचे नाव घेतले जाईल त्या सदस्याने संदेश पत्रात असलेल्या सदस्याला लिहिलेली गोष्ट करण्यास पटवायचे आहे.

या सवाल ऐरणीचा टास्क मध्ये शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे या दोघींनी अनुक्रमे अभिजित बिचुकले आणि वैशाली म्हाडे यांना संदेश पत्रात देलेली गोष्ट करण्यास पटवायचे आहे. अभिजित बिचुकले यांचा वाद घरातील बहुतेक सदस्यांबरोबर आहे तर पहिल्या दिवसापासून शिवानी सुर्वेसोबत असलेला वाद सगळ्यांनाच माहिती आहे. 

यानंतर अभिजित बिचुकले शिवानी सुर्वेला नॉमिनेशन मधून वाचविण्यास तयार होतील? तर नेहा शितोळेला वाचविण्यासाठी वैशाली म्हाडे तयार होईल? हे बघणे रंजक असणार आहे.

याच टास्क दरम्यान अभिजित केळकर आणि रुपाली भोसले खूप भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले कारण असे कि, सवाल ऐरणीचा या टास्कमध्ये विणा जगताप आणि मैथिली जावकर यांच्यासाठी अनुक्रमे अभिजित आणि रुपाली यांना बिग बॉस यांनी सांगितलेल्या गोष्टी नष्ट करायचा आहे. अभिजित केळकरला त्याच्या मुलांचे आणि कुटुंबाचे फोटो तर रुपालीला तिच्या भावाने दिलेला टेडी नष्ट करायचा आहे. आता अभिजित आणि रुपाली या गोष्टी नष्ट करून विणा आणि मैथिलीला वाचवू शकतील?

तेंव्हा या सवाल ऐरणीचा या टास्क मध्ये नक्की काय होईल? हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.