बॉलीवूड दिग्दर्शक, शोमॅन सुभाष घई यांची निर्मिती असलेला आणि अमोल शेटगे यांच दिग्दर्शन असणारा नवा कोरा मराठी चित्रपट 'विजेता' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि नुकतच सुबोध भावे याने या सिनेमाचे पोस्टर आपल्या सोशल मिडिया अकाउंट वरून शेअर केले आहे. 'अनेक पराभवानंतरही जो टिकून राहतो तोच खरा 'विजेता' अशी भन्नाट टॅग लाईन असलेलं चित्रपटाचं पोस्टर, सुबोध भावे सोबत माधव देवचक्के याने सुद्धा त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वर शेअर केलं आहे. यामध्ये सुबोध भावे, नेहा महाजन, पूजा सावंत, माधव देवचक्के, सुशांत शेलार, प्रीतम कागणे, मानसी कुलकर्णी, तन्वी किशोर, दिप्ती धोत्रे, कृतिका तुलसकर, गौरीश शिरपूरकर व देवेंद्र चौघुले यांसारखी मल्टिस्टार कास्ट पहायाला मिळणार आहे.       सन ई चौघडे, वळू आणि राष्टीय पुरस्कार प्राप्त समिता, या तीन यशस्वी मराठी चित्रपटांच्या निर्मितीनंतर सुभाष घई, पुन्हा एकदा आपल्यासाठी विजेता या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. गोवा चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाच पहिलं पोस्टर लाँच करण्यात आले होते. आणि आता या चित्रपटाचे फायनल पोस्टर लाँच करत येत्या १२ मार्च २०२० रोजी हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे हे पक्क झालं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर, आपल्याला पूजा सावंत सायकलिंग, नेहा महाजन रनिंग आणि माधव देवचक्के गोळा फेक करताना दिसत आहे. यावरूनच हा चित्रपट खेळाशी निगडित असणार आहे, हे कळून येते. 

      सुभाष घई यांची निर्मिती असलेल्या 'विजेता'  या चित्रपटाचं संगीत रोहन - रोहन यांनी केलं असून, सुबोध भावे, नेहा महाजन, पूजा सावंत, माधव देवचक्के, सुशांत शेलार यांसारखी तंगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट आपलं मनोरंजन करेल एवढं मात्र नक्की.