'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे' अशी प्रेरणादायी टॅगलाइन घेऊन 'अनन्या' आता रुपेरी पडद्यावर येत आहे. प्रताप फड लिखित आणि दिग्दर्शित "अनन्या" हा चित्रपट नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या चित्रपटात मराठी टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा म्हणजेच ऋता दुर्गुळे हि मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हृताने ह्या आधी दुर्वा, फुलपाखरू ह्या मालिकांमध्ये तसेच दादा एक गुड न्यूज आहे ह्या नाटकामध्ये काम केले आहे आणि आता अनन्या हा चित्रपट घेऊन ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


ह्या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले असून हृताने अनन्या चित्रपटाच्या सेट वरचे काही फोटोस तिच्या सोशल अकाउंट वरून शेअर केले आहे चला तर बघूया अनन्या चित्रपटाच्या सेट वरचे हे खास फोटोस :
ड्रीमविव्हर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्सच्या ध्रुव दास आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर स्वरूप स्टुडिओजचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवल्यानंतर अनन्या ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे.