लग्नाची सगळी तयारी झाली आहे, लग्नमंडप सजला आहे, यापेक्षा अधिक तर मुंडावळ्या बांधून नवरदेव सुद्धा तयार आहे, पण जर नवरी मुलगीच मिळत नसेल तर ? लग्नव्यवस्था या शुभमंगल कार्याला घेऊन घडणाऱ्या अनेक गंमतीजमती आणि यामुळे होणारा गोंधळ हे सार काही आपल्याला लेखक दिग्दर्शक सुरेश रामदास ठाणगे, यांचा आगामी चित्रपट 'बायको देता का बायको'  या चित्रपटामध्ये अनुभवायला मिळणार आहे. धनंजय रामदास यमपुरे, नितीन गावडे आणि महादेव घरत यांची निर्मिती असणारा हा चित्रपट आपल्याला येत्या २१ फेब्रुवारी २०२० रोजी पाहायला मिळणार आहे.

    लग्न म्हटलं कि, येते तयारी आणि या तयारीमध्ये चालणारी गडबड हे सार काही आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. नुकताच सोशल मीडिया साईटवर या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आहे. आणि खूप कमी वेळातच हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस सुद्धा पडत आहे. सुरेश ठाणगे, श्वेता कुलकर्णी, आरती तांबे, सुनील गोडबोले, अभिलाषा पाटील, किशोर ढमाले आणि सिद्धेश्वर झाड़बुक्के यांसारख्या कलाकारांची फौज आपण या चित्रपटामध्ये बघू शकतो. चित्रपटाच्या ट्रेलर सोबतच यामधील जीव माझा झाला खुळा हे गाणं सुद्धा सोशल मीडिया वर लाँच करण्यात आलं. धनश्री गणात्रा, ए. आर. माने यांनी चित्रपटांमधील गाण्यांना संगीत दिले आहे.

    लग्नाला उभा असणारा नवरदेव, पण जर त्याच्या जोडीला उभी असणारी नवरी मुलगीच सापडत नसेल तर ? या साऱ्या गोष्टीला घेऊन उडणारा गोंधळ आणि  सारी धमाल मस्ती आपण या चित्रपटामध्ये पाहू शकतो. लेखक दिग्दर्शक सुरेश रामदास ठाणगे यांचा 'बायको देता का बायको' हा चित्रपट येत्या २१ फेब्रुवारीला २०२० आपल्या भेटीला येणार आहे.