स्वराज्याच स्वप्न मनात ठेऊन, त्याचं दिशेने वाटचाल करणारी जिजाऊ, यांचे जीवनपट उलघडणारी 'स्वराज्यजननी जिजामाता' , या सोनी मराठीवरील मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आणि या मालिकेने आता पर्यंत जिजामाता यांच्या जीवनातील अनेक महत्वाचे टप्पे प्रेक्षकांसमोर सादर केले. मग त्यामध्ये त्याची सुरु असणारी शस्त्र आणि शास्त्र अभ्यासमालिका किंवा शहाजीराजे भोसले यांच्या सोबतचा लग्न सोहळा या साऱ्या गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनात एक मोलाचं घर बनवलं. आणि यापुढे सुरु झालेला त्यांचा जिजामाता शहाजी भोसले हा प्रवास, हे सार काही आपल्यासमोर मांडण्यात आले आहे.

     पु. ना. गाडगीळ यांच्या साथीने मालिकेतील प्रत्येक पात्रासाठी खास दागिने बनवण्यात आले आहेत. आणि आता ‘शाही नथीचा नजराणा’ या स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजयी झालेल्या प्रत्येक प्रेक्षकाला या शाही नथीचा आणि ठुशीचा मान मिळणार आहे. मालिकेचे निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर या प्रश्नमंजुषा स्पर्धेची माहिती दिली आहे. ८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान दररोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या प्रेक्षकांमधून, दररोज एका प्रेक्षकाला  पु. ना. गाडगीळ यांनी तयार केलेली शाही सोन्याची नथ आणि महाविजेत्याला शाही ठुशी मिळणार आहे. उत्तरे देण्यासाठी Log in करा, www.sonymarathi.com या वेबसाईट वर, 

     


'छत्रपती शिवाजी महाराजांना' स्वतंत्र स्वराज्यासाठी तयार करणारी आणि वेळप्रसंगी हातामध्ये शस्त्र घेणाऱ्या जिजामाता नेहमीच प्रेक्षकांसाठी एक आदरमूर्ती म्हणून उभ्या राहिल्या आहेत. आपले संपूर्ण आयुष्य, स्वराज्यासाठी वाहून घेणाऱ्या या मातेचे जीवनपट आपल्याला दररोज सोनी मराठी या वाहिनीवर,'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेमधून अनुभवायला मिळत आहे.