आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मराठी आणि हिंदी चित्रपटश्रुष्टीला भुरळ पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लवकरच एका इंग्रजी नाटकामधून आपल्या समोर येत आहे. आणि ते नाटक म्हणजे अगाथा ख्रिस्तीची कथा असलेल्या ‘द मिरर क्रॅक्ड’ मेली स्टीलचे दिग्दर्शन असलेल्या या नाटकात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ममता ही भूमिका साकारते आहे. या पाश्र्वभूमीवर ती प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक करते आहे. वेल्स मिलेनियम सेंटर आणि विल्टशायर क्रिएटिव्ह यांची निर्मिती असलेल्या ‘द मिरर क्रॅक्ड’ या नाटकात सुहास आहुजा, झेरवान बुनशाह, शेरनाझ पटेल, झिनीया रांजी यांची प्रमुख भूमिका  आहे.     ‘सखाराम बाइंडर’, ‘आम्ही खरंच निष्पाप होतो’, ‘व्हाइट लिली नाइट रायडर’ ही नाटके करणाऱ्या सोनालीसारख्या चतुरस्र अभिनेत्रीला रंगभूमी नेहमीच खुणावते. पाच वर्षांपूर्वी ‘व्हाइट लिली नाइट रायडर’ नावाच्या नाटकाची निर्मिती आणि अभिनयही केला होता. प्रेक्षकांना हे नाटक आवडले होते. त्याच सोबत सोनाली कुलकर्णीने मराठी, हिंदी, बंगाली, इंग्रजी, इटालियन, तामिळ, तेलगू याभाषेतील चित्रपट सुद्धा केले आहेत. दिल चाहता है, टॅक्सी नंबर ९२११, प्यार तुने क्या किया यांसारख्या हिंदी तर आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, देऊळ, दोघी, गुलाबजाम, डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि  कच्चा लिंबू यांसारख्या मराठी चित्रपटामधून आपले मनोरंजन केले आहे.

      मराठी आणि हिंदी चित्रपटश्रुष्टि मध्ये काम करत असताना, सोनाली नेहमीच काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नामध्ये असते. आणि याचीच पोचपावती सोनालीला नेहमी मिळत आली आहे. ज्यामध्ये २०१५ मधील डॉ प्रकाश बाबा आमटे आणि २०१८ मधील कच्चा लिंबू या चित्रपटांसाठी फिल्मफ़ेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटांमध्ये आपल्या अभियानाची छाप सोडणारी अभिनेत्री आता इंग्रजी नाटक ‘द मिरर क्रॅक्ड’ यामधून प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार आहे. आणि सोनाली कुलकर्णी इथे सुद्धा आपल्या अभियानाचा डंका वाजवेल यात काही वाद नाही.