मराठी कलाकार आपल्या चाहत्यांचा जवळ राहण्यासाठी नेहमीच काहीतरी नवीन प्रयोग करत असतात,मग तो नवीन किव्हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट असो एखादी मालिका किव्हा एखाद नाटक असो,आपल्या अभिनयाने आणि नवीन नवीन प्रयोगाद्वारे ते नेहमीच आपल्या चाहत्यांना त्यांच्या कलागुणांचे वेगवेगळे रंग दाखवत असतात. 

अश्याच प्रकारे आपला लाडका अभिनेता निखिल चव्हाण नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे, आणि आता एका हटके फोटोशूट ने त्याने सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे वळवले आहे, ह्यावेळी त्याने चक्क शेतकरी बंधूंची किमया मांडणारे फोटोशूट केले आहे.