मुंबई- प्रसिद्ध कवी आणि लेखक चंद्रशेखर गोखले लिखित आणि निलेश अरुण कुंजीर दिग्दर्शित "शेवंती" ह्या लघुपटाची मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (MIFF) येथे निवड झालेली आहे. २९ जानेवारी ला सकाळी १०.३० ला शेवंती चे स्क्रिनिंग Film division (AUDI II), मुंबई येथे होतंय. यामध्ये प्रथमच आदिनाथ कोठारे आणि दीप्ती देवी हि फ्रेश जोडी लोकांसमोर येते आहे. प्रेम आणि लग्नानंतरचे नातेसंबंध यावर भाष्य करणाऱ्या या उत्तम कथेला visually जास्त न्याय मिळू शकतो असे लघुपटाचे दिग्दर्शक निलेश कुंजीर याला वाटले आणि त्यानंतर "शेवंती" हि कथा लघुपट म्हणून आकार घेऊ लागली. आदिनाथ चे बोलके डोळे आणि दिप्तीची निरागसता शेवंतीला अजून टवटवीत करतात. शेवंतीसाठी छायाचित्रण प्रथमेश रांगोळे, संकलन जागेश्वर ढोबळे, साऊंड डिझायन प्रशांत कांबळे आणि डीआय अमित धनराज यांनी काम केले आहे.

या लघुपटाचे कथावाचन सुमधुर आवाज लाभलेले असे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांनी केलंय. तसेच त्यांनी त्यांच्या मुलासमवेत म्हणजेच सुरेल इंगळे याच्यासोबतीने शेवंतीला पार्श्वसंगीत दिले आहे. वननेस फिल्म्स निर्मित शेवंती लघुपटाची Miff सोबतच, Third Eye Asian film Festival(Mumbai),Chitra Bharati Film Festival (Ahmedabad), 7th Siliguri Short film Festival ( West bengal) येथे सुद्धा निवड झालेली आहे.


Starring 
Addinath Kothare & Dipti Devi

Produced By
Oneness Films

Written By 
Chandrashekhar Gokhale

Directed by 
Nilesh Arun Kunjir 

Music by  
Milind Ingle & Surel Ingle 

Voice Over 
Milind Ingle 

Cinematographer 
Prathmesh Rangole 

Editor 
Jageshwar Dhoble 

Sound Design & Mix 
Prashant Kamble 

DI 
Amit Dhanraj 

Asst. Director
Girish Jamdade

Subtitles 
Abhas Narvekar

Gaffer
Vijay Gujar

Camera Team
Vinayak Chougule
Prathmesh Sindkar

Folly
Rohan Naik
Shreenath Iyer
(Swarsamwad Studio)

Stills 
Poonam Mulik

Associate Producer 
Mangesh Dawkhar
Prasad Khenat