झी मराठी आणि अद्वैत थिएटर नेहमीच आपल्यासाठी काहींना काही, नवीन घेऊन येत असत. आरण्यक, निम्मा शिम्मा राक्षस आणि अलबत्या गलबत्या यांसारख्या नाटकांची मेजवानी अद्वैत थिएटरने आपल्या समोर सादर केली आहे. आणि या सगळ्याच नाटकांवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. २०१८ मध्ये  रंगभूमीवर पदार्पण केलेल्या अलबत्या गलबत्या या झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत थिएटर्स निर्मित धमाल बालनाट्याने २०१९ मधे सुद्धा बालक पालक रसिक प्रेक्षकांचे तूफान मनोरंजन केले. यामध्ये वैभव मांगले या हरहुन्नरी कलाकाराने सादर केलेल्या खडूस, भोळ्या, विसराळू अशा धमाल चेटकिणीचे गारूड आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. याच अलबत्या गलबत्याच्या यशानंतर रंगभूमीवर अजून एका बालनाटकाने एन्ट्री केली, आणि ते नाटक म्हणजे निम्मा शिम्मा राक्षस बाटलीतल्या राक्षसाची ढिंच्यॅक गोष्ट सांगणाऱ्या या नाटकालादेखील बालदोस्तांचा धमाल प्रतिसाद मिळतो आहे.

      याचबरोबर सरतेशेवटी अद्वैत थिएटर्सने आणलयं एक कमाल कथानक असलेलं मिलिंद शिंत्रे लिखित दिग्दर्शित, इब्लिस हे नाटक, आधीच्या सादर झालेल्या अद्वैत थिएटर्सच्या, नाटकांपैकी हे संपूर्णतः वेगळ नाटक अद्वैत थिएटर्स आपल्या नाट्यरसिकांसाठी घेऊन आलय. यामधे आपल्या सगळ्यांची लाडकी शेवंता, रात्रीस खेळ चाले 2 फेम म्हणजेच अपूर्वा नेमळेकर एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळेल. त्याच सोबत या नाटकात आपण वैभव मांगले, सुनील देव आणि राहुल मेहेंदळे या कलाकारांना सुद्धा बघू शकतो.

        आरण्यक, अलबत्या गलबत्या आणि निम्मा शिम्मा राक्षस या नाटकानंतर, झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत थिएटर्स यांचं २ अंकी नाटक इब्लिस सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने रंगभूमी गाजवेल यात काही वाद नाही.